दर्शन सिंह - सूफी शायर आणि संत

दर्शन सिंह - सूफी शायर आणि संत

संत दर्शन सिंह जी महाराज यांचा जन्म 14 सप्टेंबर, 1921 रोजी रावळपिंडी, पाकिस्तानमधील कौंट्रीला गावात झाला. ते वयाच्या पाचव्या वर्षापासूनच अध्यात्माशी जोडले गेले होते आणि त्यांचे संगोपन अशा वातावरणात झाले जे अध्यात्मिकतेने ओतप्रोत होते. त्यांच्या वडिलांचे नाव परम संत कृपाल सिंह जी महाराज आणि आईचे नाव माता कृष्णावंती असे होते. त्यांच्या आध्यात्मिकतेचा 15 वर्षांचा कालावधी त्यांच्या असीम प्रेम, दया भाव तसेच नम्रता या गुणांनी जाणला जातो.

दर्शन सिंह - सूफी शायर आणि संत
शिक्षकांमध्ये शिष्याच्या जीवनात बदल घडवण्याची शक्ती

संत दर्शन सिंह जी महाराजांना लाखो लोक या शतकातील महान संत आणि मानव एकतेचे समर्थक म्हणून त्यांचे स्मरण करतात. संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या अध्यात्मिक उत्तराधिकारीच्या रूपात त्यांनी सावन कृपाल रुहानी मिशनची स्थापना केली. त्यांनी परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या अध्यात्मिक कार्याचा वारसा विश्वभरात 450 केंद्रे स्थापन करून पुढे चालविला. त्यांनी दिल्लीमध्ये मिशनचे मुख्यालय "कृपाल आश्रमाची" स्थापना केली. जेणेकरून विश्वभरातुन अध्यात्मिक जिज्ञासूंना सत्संग आणि ध्यान-अभ्यासा च्या दैनंदिन कार्यक्रमात सहभागी होता यावे.

संत दर्शन सिंह जी महाराज यांनी हजारो बंधू-भगिनींना नाम दानाची दीक्षा देऊन प्रभूच्या ज्योती आणि श्रुतीशी जोडले. त्यांनी समजाविले की, अध्यात्म एक सकारात्मक आणि प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा मार्ग आहे, ज्यामध्ये व्यक्ती अध्यात्मिक उन्नती आणि ध्यान-अभ्यासाद्वारे दिव्य जीवन जगत असताना, आपला परिवार, समाज आणि राष्ट्रा प्रति आपल्या कर्तव्यांना खूप चांगल्या प्रकारे पार पाडता येते.

आपल्या उपदेशांप्रमाणेच संत दर्शन सिंह जी महाराज आपली स्वतःची उपजीविका स्वकष्टार्जित कमाईने करीत होते. भारत सरकारची 36 वर्षे सेवा केल्यानंतर 1979 मध्ये डेप्युटी सेक्रेटरी पदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या पदाशी सलंग्न कर्तव्य निभावत असताना परमार्थाचे सुद्धा कार्य केले.

संत दर्शन सिंह जी महाराज यांना सुफी शायरीच्या उर्दू आणि फारर्सी भाषांतील गजल चे रचनाकार या नात्याने भारतातील एक महान सुफी शायरच्या रूपात त्यांना ओळखले जाते. त्यांचे काव्यसंग्रह मंजिले-नूर(दिव्य-प्रकाश प्राप्ती चे ध्येय), तलाश-ए- नूर(दिव्य प्रकाशाचा शोध), मताए-नूर( दिव्य-प्रकाशीय तेजाचे भंडार), जादा-ए- नूर (दिव्य-ज्योती मार्ग) आणि मौजे- नुर(दिव्य-प्रकाशाचे तरंग) याकरिता त्यांना चार वेळा उर्दू अकादमी द्वारे सन्मानित केले गेले.

संतमता च्या प्रसारासाठी त्यांनी 1978, 1983, 1986 आणि 1988 च्या कालावधीमध्ये चार विश्व यात्रा केल्या. युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा दौरा केला. नोव्हेंबर 1988 मध्ये दिल्लीत संत दर्शन सिंह जी महाराजांच्या अध्यक्षतेखाली 15 व्या मानव एकता संमेलनाचे आयोजन केले, ज्यामध्ये हजारो लोकांबरोबर अनेक धार्मिक व सामाजिक नेते सहभागी झाले.

संत दर्शन सिंह जी महाराजांनी 30 मे 1989 रोजी या भौतिक जगाचा निरोप घेतला. त्यांचे अध्यात्मिक कार्य त्यांचे सुपुत्र, वर्तमान सद्गुरु संत राजिंदर सिंह जी महाराज संपूर्ण विश्वात प्रसारित करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com