Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगBlog : भारतात करोनाची पहिली, दूसरी आणि तिसरी लाट

Blog : भारतात करोनाची पहिली, दूसरी आणि तिसरी लाट

नाशिक | सुधीर पगार

चीन मधील वुहान शहरात ३१ डीसेंबर २०१९ रोजी कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळला आणि आज संपूर्ण जग त्याने व्यापले आहे. भारतात देखील २७ जानेवारी २०२० रोजी पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळून आला आणि सध्या दुसऱ्या लाटेने (लाट कसली त्सुनामीच ती) संपूर्ण देशाला ग्रासले आहे…

- Advertisement -

दिनांक ०७/०५/२०२१ रोजी कोरोनाबाबतची जागतिक व देश पातळीवरील महत्वाची तुलनात्मक आकडेवारी खालीलप्रमाणे (सदर आकडेवारी worldometers.info या साईट वरुन घेतलेली आहे).

जगात देशात

एकूण रुग्ण – १५.७३ कोटी २.१९ कोटी

बरे झालेले रुग्ण – १३.४६ कोटी १.७९ कोटी

उपचार घेत असलेले

रुग्ण – १.९४ कोटी ३७.३१ लक्ष

एकूण मृत्यु – ३२.७७ लक्ष २.३८ लक्ष

एका दिवसात आढळलेली उचांकी व निचांकी रुग्ण संख्या

८.४३ लक्ष ९८.० हजार

(०७/०१/२०२१) (१६/०९/२०२०)

२.६९ लक्ष ९.०० हजार

(१५/०२/२०२१) (२५/०१/२०२१)

९.०३ लक्ष ४.१३ लक्ष

(२३/०४/२०२१) (०५/०५/२०२१)

एका दिवसातील उचांकी व निचांकी ऍक्टीव रुग्ण संख्या

१.९० कोटी १०.१२ लक्ष

(२३/०१/२०२१) (१९/०९/२०२०)

१.५० कोटी १.३८ लक्ष

(१०/०३/२०२१) (११/०२/२०२१)

१.९४ कोटी ३७.३१ लक्ष

(०७/०५/२०२१) (०७/०५/२०२१)

एका दिवसातील उचांकी व निचांकी रुग्ण मृत्यु संख्या

१७,३४७ १,२८३

(२०/०१/२०२१) (१५/०९/२०२०)

५,७८२ ७२

(०७/०३/२०२१) (०६/०२/२०२१)

१५,३४८ ३,९२०

(२८/०४/२०२१) (०७/०५/२०२१)

देशात २५ मार्च २०२० पासून संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला होता, जो की अत्यंत गरजेचा होता. आपल्याकडे असलेल्या तोकडया आरोग्य सुविधा, उपकरणांची कमतरता (मास्क, पीपीई किट्स, सँनिटायजर, वेंटिलेटर इ.) इत्यादींच्या पुर्ततेसाठी हा कालावधी खुप उपयुक्त ठरला. या कालावधीत या सुविधांची बऱ्याच अंशी पूर्तता करण्यात आपण यशस्वी झालो. भारतासारख्या महाकाय देशात एकाच वेळी लाट येणे शक्य नव्हते.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधीत रुग्णांची वाढ दिसून आली व साधारणत: सप्टेंबर २०२० मध्ये देशात सर्वात जास्त एँक्टीव रुग्ण संख्या १०,११,७३२ व त्यानंतर फेब्रूवारी २०२१ मध्ये सर्वात कमी एँक्टीव रुग्ण संख्या १,३७,५७८ इतकी आढळून आली, म्हणजेच पहिली लाट ही साधारण सप्टेंबर २०२० पर्यंत शिखरावर पोहोचली व नंतर हळू हळू कमी होत फेब्रूवारी २०२१ मध्ये बऱ्याच अंशी ओसरली.

नोव्हेंबर २०२० ते फेब्रूवारी २०२१ या कालावधीत पुन्हा देश हळू हळू पूर्वपदावर येत असतांना लग्न समारंभ, वाढदिवस, अंत्यविधी, जिम्स, मॉल्स, उद्याने, धार्मिक स्थळे याठिकाणी पुन्हा गर्दी होऊ लागली. त्यात देशातील विविध निवडणुकांमुळे यात मोठी भर पडली.

रुग्ण संख्या कमी होत असल्याने आपण कोरोना संपला अशा आविर्भावात वावरु लागलो व मास्क, सँनीटायजर वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे ह्या कोविड अँप्रोप्रिएट बिहेविअरचा कंटाळा करु लागलो व इथेच परत कोरोनाने उचल खाल्ली.

खरतर जगातील इतर देशांमधे आलेली लाट आपल्याला देखील खुणावत होती पण त्यावर वारंवार चर्चे पलीकडे आपण प्रत्यक्षात काळजी घेतली नाही आणि नकळत दुसऱ्या लाटेला आमंत्रण देवून बसलो.

रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे पहिल्या लाटेत उभारलेली कोविड सेंटर्स बंद पडली होती. फेब्रूवारी २०२१ मध्ये अचानक रुग्ण संख्या वाढू लागली आणि एप्रिल २०२१ अखेर दर दिवसाला ४.०० लाख रुग्णांपर्यंत हा आकडा पोहोचला.

दुसऱ्या लाटेत २ ते ३ नविन स्ट्रेन आढळून आलेत आणि ते आधीच्या स्ट्रेन्सच्या तुलनेत जास्त प्रमाणात संसर्ग पसरवणारे असल्याने पहिल्या लाटेपेक्षा ४.०० पटीने जास्त रुग्ण संख्या वाढू लागली.

एवढ्या मोठ्या रुग्ण संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडू लागला व रुग्णांना उपचारासाठी इस्पितळे अपुरी पडू लागलीत. गेल्या वर्षभरापासून डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचारी यांचेवर प्रचंड ताण आहे. ऑक्सिजन, रेमडीसीविर व इतर औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागला त्यामुळे रुग्णांच्या मृत्यु मध्ये वाढ होऊ लागली.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते पहिल्या लाटेत रुग्णालयात भरती झालेल्या ४१.१०% रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती ती दुसऱ्या लाटेत ५४.५०% वर पोहोचली व देशात आपत्कालीन स्थिति निर्माण झाली. केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या उपायांमुळे ऑक्सिजनचा पुरवठा हळू हळू वाढत असून रुग्णांना दिलासा मिळेल अशी आशा वाटू लागली आहे.

सध्यातरी देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. एक मात्र खरे की बीसींजी लस असेल किंवा यापूर्वी विविध व्हायरसशी केलेला सामना असेल, भारतीयांमध्ये इतर देशांच्या तुलनेत मृत्युदर कमी आहे ही आशादायक बाब आहे.

भारतात लसीकरणाला थोडी उशिराने सुरवात झाली. देशात २८ एप्रिल २०२१ पर्यंत कोविशिल्ड व कोव्हँक्सिन या दोन लसी वापरात असून ४५ वर्षांवरील व वैद्यकीय व आपत्कालीन सेवेतील अंदाजे १६.२६ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून यात एक डोस घेतलेल्या १३.११ कोटी (९.६०%) व दोन डोस घेतलेल्या ३.१५ कोटी (२.३०%) नागरिकांचा समावेश आहे, जो की जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत जास्त आहे.

सध्या देशात कोविशिल्ड दरमहा अंदाजे ७.०० कोटी व कोव्हँक्सिन २.० कोटी डोस असे एकूण ९.०० कोटी डोसची निर्मिती करता आहेत.जुलैपासून दरमहा कोविशिल्ड अंदाजे १०.० कोटी व कोव्हँक्सिन दरमहा ६.५० कोटी डोस पर्यंत निर्मिती वाढवणार असल्याचे सदर कपन्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सिरम व भारत बायोटेक ह्या कंपन्यांना अनुक्रमे ३००० व १५०० कोटींची आगाऊ रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.

देशात वैद्यकीय व आपत्कालीन सेवेतील व ४५ वर्षांवरील अंदाजे ३५ कोटी व १८ ते ४५ वर्ष वयोगटातील ५५ कोटी असे एकूण ९० कोटी (६७%) नागरिक आहेत व त्यासाठी १८० कोटी डोसची आवश्यकता आहे. आजपावेतो १३.११ कोटी एक डोस व ३.१५ कोटी दोन डोस असे एकूण १९.४१ कोटी डोस देण्यात आलेले आहेत. उर्वरित १६०.५९ कोटी डोसची गरज आहे.

कोविशिल्ड व कोव्हँक्सिनचे पुढील दोन महिने दरमहा ९.०० कोटी प्रमाणे १८.० कोटी डोस व जुलै पासून दरमहा १६.५० कोटी डोस उपलब्ध होऊ शकतात. तसेच आता रशियाची स्पुटनिक लस सुद्धा देशात उपलब्ध झाली आहे.

भारतात तिसरी लाट सप्टेंबर २०२१ मध्ये येऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. जाणकारांच्या मते जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच नजीकच्या काळात कोरोनावर मात करण्याचा प्रभावी मार्ग आहे. मे ते सप्टेंबर २०२१ या पाच महिन्यांच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून ६८.० कोटी डोस उपलब्ध होऊ शकतात, म्हणजेच साधारण ३२.० कोटी लोकांना दोन डोस देऊन होऊ शकतात.

१८ वर्षांवरील सर्वांचे पुढील पाच महिन्यात लसीकरण पूर्ण करायचे झाल्यास मोठ्या प्रमाणात लसींची आयात करावी लागेल आणि ज्या राज्यात व शहरात कोरोनाची जास्त लागण झाली आहे तेथे प्राधान्याने लसीकरण केल्यास आपण तिसऱ्या लाटेची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्यात यशस्वी होऊ शकू असे वाटते.

अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक श्री. गौतम मेनन यांच्या मतानुसार भारतात प्रत्यक्षात नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या २० ते २५ पट रुग्णांची नोंदच होत नाही व यात लक्षण विरहित रुग्ण संख्या जास्त आहे.

सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्ये सेरो सर्व्हेची आकडेवारी प्रसिध्द केली त्यात नोंद न झालेल्या रुग्णांची संख्या २७.५०% असल्याचे सांगितले. मिशिगन विद्यापीठाच्या साथरोग तज्ञ प्राध्यापिका भ्रमर मुखर्जी यांच्या मते सेरो सर्व्हे हा फक्त शहरांमध्ये केला गेला व भारतात ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या देखील मोठी असल्याने नोंद न झालेल्या रुग्णांची संख्या १० ते २० पट एव्हढी असू शकते.

साधारण मे २०२१ अखेर भारतात एकूण रुग्ण संख्या २.५० कोटी पर्यंत पोहोचेल असे गृहीत धरल्यास त्याच्या २० पट म्हणजेच ५० कोटी नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतील. ५० कोटी नागरिकांमध्ये अँटीबॉडीज व ४० कोटी नागरिकांचे लसीकरण सप्टेंबर अखेर झाल्यास भारत हर्ड इम्युनिटीच्या दिशेने अग्रेसर होऊन तिसरी लाट रोखता येईल असे वाटते.

दुसऱ्या लाटेची सुरवात महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांमध्ये आधी झालेली असल्याने मे अखेर ही राज्ये या लाटेतून आधी बाहेर येतील. त्यानंतर उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा ही राज्ये व शेवटी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओरिसा, केरळ या राज्यात दुसरी लाट ओसरू लागेल असा अंदाज आहे.

खरंतर लसींचा पूर्वेतिहास पाहता कोठलाही नवीन आजार आल्यानंतर त्यावरील लस तयार करण्यास चार ते दहा वर्षांचा कालावधी लागत होता. परंतु विज्ञानातील प्रगतीमुळे व शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमामुळे अवघ्या वर्षभराच्या आत कोरोनावर एक नाही, दोन नाही तर ७ ते ८ लसी आज उपलब्ध आहेत व अजून बऱ्याच येऊ घातलेल्या आहेत. विज्ञान आणि निसर्ग एकमेकांवर भविष्यात देखील अशा कूरघोड्या करतच राहणार आहेत हे सत्य नाकारता येणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील आरोग्याच्या सोयी सुविधा बळकट झाल्यास भारतीयांच्या आरोग्यासाठी तो मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही. आपण भारतीय नव्याने उपलब्ध झालेल्या सोयी सुविधा चिरकाल टिकवून ठेवू अशी अपेक्षा करू या व जगावर व देशावर आलेल्या या महामारीच्या संकटावर ध्येर्याने व आत्मविश्वासाने मात करू या.

सुधीर पगार, नाशिक ९४२२२६९४४६

- Advertisment -

ताज्या बातम्या