Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : समाजशास्त्रातील नव्या वाटा

Blog : समाजशास्त्रातील नव्या वाटा

देशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने समाजशास्त्र विषयासंबंधी अभ्यासक्रम असले तरीही ते फारसे सखोल नसल्यामुळे हे अभ्यासक्रम पूर्ण केले तरीही विद्यार्थ्यांना करियरच्यादृष्टीने चांगले मार्ग उपलब्ध होत नसत. मात्र आता या विषयात बदल करून तो करियरच्यादृष्टिने अधिक योग्य बनवला गेला आहे. अभ्यासक्रमाची कमरता दूर करून दिल्लीतील डॉ.आंबेडकर विद्यापीठाने ‘बी. ए. ऑनर्स विथ मेजर इन सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज’ हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करियरच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करणे पूर्वीफारसे महत्वाचे वाटत नसे. कारण देशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने या विषयासंबंधी अभ्यासक्रम असले तरीही ते फारसे सखोल नव्हते. त्यामुळे समाजशास्त्रासंबंधी अभ्यास पूर्ण केला तरीही विद्यार्थ्यांना करियरच्यादृष्टीने चांगले मार्ग उपलब्ध होत नसे. या विषयातील अभ्यास करणार्‍या बहुतेक विद्यार्थ्यांना नेहमीच मागे पडलेले विद्यार्थी असे मानले जात असे. मात्र आता या विषयात बदल करून तो करियरच्यादृष्टीने अधिक योग्य बनवला गेला आहे.

- Advertisement -

देशातील निरनिराळ्या विद्यापीठांमध्ये बी. ए. जनरल या पदवीचा अभ्यास सामान्यरूपाने होत असे. हा अभ्यासक्रम ज्ञानाच्यादृष्टीने तितकासा सखोल नसल्यामुळे तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कुठल्या एखाद्या विशिष्ट्य क्षेत्रावर आपली पकड बनवू शकत नसे. या कमरता दूर करून दिल्लीतील भीमराव आंबेडकर विद्यापीठाने बीए ऑनर्स विथ मेजर इन सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. पदवी दरम्यान समाजशास्त्राच्या कुठल्याही तीन विषयांमध्ये उत्तम प्रभुत्व मिळवून भविष्यात त्यापैकी एका क्षेत्रात आपली आवड विकसित करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा खूप उपयोग होवू शकतो.

समाजशास्त्र आणि मानवशास्त्र या पदवी अभ्यासक्रमात इतर विषयांप्रमाणेच सखोलता आहे. डॉ. आंबेडकर विद्यापीठातील या अभ्यासक्रमात 96 क्रेडीट पैकी एखाद्या विषयात 48 क्रेडीट मिळाले तर त्या विद्यार्थ्याला त्या विषयातील ‘मेजर’ असे म्हटले जाते. म्हणजे ‘बीए ऑनर्स विथ मेजर इन इंग्लिश’ अशाच प्रकारे अन्य तीन विषय मिळून 48 पेक्षा जास्त क्रेडीट मिळवणे म्हणजे त्याला बीए ऑनर्स विथ मेजर इन सोशल सायन्स असे म्हटले जाईल. कुठल्याही पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना फाऊंडेशन कोर्स किंवा जनरल स्टडी करावा लागतो. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करणे हाच यामागचा प्रमुख उद्देश आहे.

यामध्ये तर्कशास्त्र आणि प्रदेशशास्त्र याबाबतची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणाची क्षमता यावी, यासाठी हा पेपर अनिवार्य ठेवला गेला आहे. पहिल्या सेमिस्टरमध्ये अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना फाउंडेशनद्वारे समाजशास्त्राचा परिचय या नावानेदेखील एक विषय शिकवला जातो. समाजातील भिन्न-भिन्न पैलूंशी ओळख करून देणे हाच यामागचा उद्देश आहे. समाजात एक वस्तू दुसरीशी कशापद्धतीने अंतर-संबंधित आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.

या व्यतिरिक्त इंग्रजी प्रोफिशियन्सी हा कोर्स देखील येथे आहे. तो दोन प्रकारचा आहे. यामध्ये एक पेपर अनिवार्य आहे. प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मेजर विषयाव्यतिरिक्त प्रत्येक सेमिस्टरमध्ये नवा पेपर दिला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार विषयाची निवड करता येते. प्रत्येक सेमिस्टरमध्ये चार विषयांपैकी दोन प्रमुख आणि दोन दुसर्‍या विषयाशी संबंधित वैकल्पिक पेपर असतात. दुसर्‍या सेमिस्टरमध्ये वैकल्पिक विषयांपैकी, पर्यावरण-मुद्दे आणि आव्हाने, भारतीय घटना आणि लोकशाही, हिंदी आधार पाठ्यक्रम, कॉन्टीटेटिव्ह मेथडस्, भारतीय आणि विश्वसाहित्याचा परिचय, भारतीय समाज-निरंतरता, परिवर्तन आणि विरोधाभास, पॉप्युलर, नॅरेटिव्हज् इत्यादी वेगवेगळे विषय असतात.

या व्यतिरिक्त इलेक्टीव्ह पेपर्सदेखील या अभ्यासक्रमात आहेत. ज्यापैकी तीन विषयात प्रत्येकामध्ये सोळा किंवा त्यापेक्षा अधिक क्रेडीट मिळवावे लागतात. पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम किंवा आवडीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधीही दिली जाते. हा अभ्यासक्रम फिल्म अ‍ॅप्रिसिएशन, थिएटर, पब्लिक रिलेशन्स्, संपादन, अकाउंटन्सी, रिटेल मार्केटींग, सेल्स, टुरिझम, टीव्ही अ‍ॅकरींग, ट्रव्हल मॅनेजमेंट इत्यादी विषयांशी निगडीत आहे. चार वर्षे बीए अभ्यासक्रम पूर्ण करून ड्युएल डिग्री एखाद्याला घ्यायची असल्यास चौथ्या वर्षात दुसर्‍या विषयामध्ये मेजर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराने बी. एड्. किंवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम करून नोकरी मिळवल्यास सुरुवातीला 25 ते 30 हजार रूपये वेतन मिळू शकते. उच्च शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षक आणि रिचर्स असोसिशिएट या रूपात नोकरी करता येते. यामध्ये वेतनही जास्त मिळते. एमबीए किंवा एमसीए केल्यानंतर वेतनात आणखी वाढ होते.

या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना एकाचवेळी अनेक करियर पर्यायांची तयारी करून घेता येते. यामध्ये विद्यार्थी समाजशास्त्रासोबत इंग्रजी प्रोफिशिएन्सी हा विषयदेखील शिकतो. एकीकडे यामध्ये लॉजिकल रिजनिंग देखील आहे तर त्यासोबत गणितदेखील आहे. या सर्व गोष्टी एमबीएच्या तयारीसाठी खूप मदतीच्या ठरतात. ज्यांचा गणित हा विषय आहे ते एमसीएदेखील करू शकतात.

याठिकाणी विद्यार्थ्यांनी पद्वी मिळवल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कुठल्याही क्षेत्रात स्पेशलाईज्ड मार्ग निवडावा लागतो. हा अभ्यासक्रम तीन विषयात पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो. हे विषय मानसशास्त्र, इतिहास, गणित किंवा समाजाशास्त्र यापैकी कुठलेही असू शकतात. एकाचवेळी अनेक विषयांचा अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांना एमबीए., एमएस डब्ल्यू किंवा एमसीएची तयारी करण्यासाठी देखील खूप मदत मिळते. लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्येदेखील निवडलेल्या विषयांचा खूप आधार मिळतो. तसेच पद्वीधर विद्यार्थी शाळांमध्ये समाजशास्त्र या विषयाचे उत्तम शिक्षक बनू शकतात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एका पेक्षा अधिक विषय शिकण्याची क्षमताही निर्माण करू शकतात.

डॉ. आंबेडकर विद्यापीठाामध्ये सुरु असणार्‍या या अभ्यासक्रमासाठी बारावीच्या गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. यामध्ये काही टक्के जागा दिल्लीतील स्थानिक रहिवाशांसाठी देखील आरक्षित आहेत. दिल्लीबाहेरच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी वेगळी तयार केली जाते. देशातील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये अथवा विद्यापीठांमध्ये असा अभ्यासक्रम सर्वसामान्यपणे ‘बी. ए. जनरल’ या नावाने राबविला जातो. यामध्ये अनेक प्रकारचे विषय विद्यार्थ्यांना तीन वर्षांत शिकवले जातात. मात्र त्यामध्ये ऑनर्स अभ्यासक्रमाप्रमाणे सखोलता नसते. दिल्ली येथील भीमराव आंबेडकर विद्यापीठात हा अभ्यासक्रम नव्या नामकरणाद्वारे आणि नव्या स्वरूपात सुरु केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या