दहावी-बारावी नंतर करिअरच्या वाटा

दहावी-बारावी नंतर करिअरच्या वाटा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,आपल्या खेळात आपण आजोबांचे डोकं खाल्ले आणि आजीचे खाल्ले नाही म्हणून आजोबा नक्कीच चिडले असणार. म्हणून आजोबांना आता तुम्ही खूश करायचे आणि आजोबांना सांगायचे, आजोबा, आज आपण एका माणसाला छळायचे आहे! यावर आजोबा नक्कीच म्हणतील, अरे बापरे! छळायचे! ते नाही जमायचे आपल्याला. हो का, मग माझ्या वयाचे होते तेव्हा तुम्ही किती जणांना छळायचे ते सांगितले मला आजीने! आणि आता म्हणतात आपल्याला जमणार नाही. हो का, तुला काय काय सांगितले तुझ्या आजीने! आता मी कशाला सांगू तुम्हाला. बरे मग कसे छळायचे तुझ्या आजीला! ते तर सांगशील का? हे बघा, आजोबा! माझ्या आवडींविषयी लिहायचे तर तुम्हाला ताण दिला ना! आता तो ताण आपण आजीकडे सोपवून मोकळे व्हायचे. आहे ना गंमत! चला तर मुला-मुलींनो, आता आपण आपल्या खेळाकडे वळूया. एक कोरा कागद घ्यायचा. कागदावर काटकोन त्रिकोण काढायचा आणि तो कागद आजीकडे देऊन सांगायचे, आजी, मला कोणत्या गोष्टी करायला आवडतात. म्हणजेच माझ्या तीन किंवा सहा आवडी या त्रिकोणाच्या बाजूने लिहायच्या आहेत.

ज्योत्सना पाटील
ज्योत्सना पाटील

आता मात्र आजीचे विचारचक्र सुरू झाले असेल आणि तुम्हालाही प्रश्न पडला असणार, मी तुम्हाला काटकोन त्रिकोणच का काढायला सांगितला? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या काटकोन हा शब्द उच्चारताच 90 अंश (90ओ) डोळ्यांसमोर आलाच पाहिजे आणि 90 अंश (90ओ) म्हणजेच एक सरळ आडवी रेष आणि या रेषेच्या एका बाजूला सरळ उभी रेष काढणे. या दोन रेषा जिथे मिळतात तो कोन 90 अंशाचा (90ओ) म्हणजेच काटकोन असतो. नंतर त्या कोनाच्या इतर दोन बाजू जोडल्यास ‘काटकोन त्रिकोण’ तयार होतो. काटकोन त्रिकोणात एक कोन 90ओ असतो म्हणजेच उरलेल्या दोन कोनांची बेरीज 90ओ असते, हे लक्षात असू द्यावे. चला तर मग विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन करिअरविषयी जाणून घेऊया. तुमच्यासारख्याच धीरज नावाच्या विद्यार्थ्याला पत्रातून केलेले मार्गदर्शन चि. धीरज यास शुभाशीर्वाद.

धीरज, तुला नौदलात जाऊन देशाची सेवा करायची आहे हे वाचून आनंद झाला. स्वप्न पाहणे आणि कृतीत आणणे यातले अंतर पार करायला अपार मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. त्याकरता तुला आतापासूनच शालेय अभ्यासाबरोबर पोहणे, सायकलिंग करणे, पळणे यांसारख्या शारीरिक कसरतींबरोबरच मातृभाषेचा, हिंदी व इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करून तिन्ही भाषा बोलण्याचा सराव करावा. त्यासाठी टीव्हीवरील कार्यक्रम पाहताना लक्षपूर्वक ऐकण्याचा सराव करावा. गणित, विज्ञान व समाजशास्त्र विषयांचा अभ्यास परीक्षा होताच विसरायचा नसतो, तर नेहमीच लक्षात राहील याचा प्रयत्न करणे. प्रत्येक विषयाचे आकलन समजून उमजून करण्याचा प्रयत्न करावा. मोबाईलचा उपयोग नौदलातील माहिती ऐकण्याकरता करावा व ऐकलेल्या माहितीची नोंद वहीत किंवा डायरीत करून संग्रही ठेवावी. नियमितपणे वृत्तपत्रे वाचण्याची सवय लावून घ्यावी. उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर वाचन करावे. कॉम्प्युटरचा कोर्स करावा जेणेकरून भविष्यात उपयोगी होईल. नौदलातील एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेऊन माहिती करून घ्यावी. तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!तुझी,ताई

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com