Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगब्लॉग : शोध सामर्थ्याचा - जलसंपदेचा यशस्वी तांत्रिक सल्लागार : प्रकाश पाटील

ब्लॉग : शोध सामर्थ्याचा – जलसंपदेचा यशस्वी तांत्रिक सल्लागार : प्रकाश पाटील

आपण जळगावला प्रगत समजत होतो, पण धुळे नंदुरबार हे जिल्हे आपल्यापेक्षा पुढे गेले आहेत. या जिल्हयातील तापी नदीवरील धरणे पूर्ण झाली आहेत, त्याचे फायदे त्यांना मिळत आहेत. स्थानिक राजकारणामुळे आपला जिल्हा मागे पडला. जिल्ह्यातील कामे पूर्ण झालीच नाहीत, जळगाव शहराला देखील व्यापारी पोटेंशीयल आहे, पण नागरी सुविधा देयात आपण कमी पडलो असल्याची खंत महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे नामांकीत तांत्रिक सल्लागार, इंजिनियर प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.

प्रकाश पाटील मुळचे पाचोरा तालुक्यातील. शालेय शिक्षण पाचोरा येथे झाले. जळगावला इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला तर पुण्याला पदवी शिक्षण घेतले. बी.ई.नंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात असि. इंजिनियर म्हणून नोकरी केली. कामाची चाकोरीबध्द पध्दत आणि नाविन्यपूर्ण कामाचा अभाव पाहता त्यांनी नोकरीस रामराम ठोकला आणि स्वत:चा खाजगी व्यवसाय सुरू केला. जलसंपदा विभागाला डिझाईन काढून देण्यास सुरवात केली. 1995 मध्ये काही काळ कंत्राटदार म्हणून काम करतांना कामाच्या टेंडर मध्ये असलेल्या शर्ती आणि प्रत्यक्ष केले जाणारे वेगळे काम पाहून त्यांना धक्का बसला. टेंडर मधील शर्ती प्रमाणे त्यांना काम करू दिले जात नव्हते. आम्ही सांगू तसे काम करा, तुमचे तुम्ही घ्या आमचे आम्हाला द्या असा अधिकार्‍यांचा आग्रह होता. तर प्रकाश पाटील यांचा कामाची गुणवत्ता, दर्जा यावर भर होता.

- Advertisement -

अखेर तुम्ही आम्हाला चालत नाही, तुम्ही केवळ तांत्रिक बाजू सांभाळा, कन्सल्टन्सी करा असा सल्ला त्यांना अधिकार्‍यांकडून दिला गेला. नगररचना संचालकांकडून त्यांना धुळ्याच्या पारोळा नाका ते धुळे रेल्वे स्टेशन 80 फुटी रोडचे डिझाईनचे पहिले काम मिळाले. पहिलेच काम मनापासून केल्याने हळूहळू अशी अनेक कामे त्यांच्याकडे येऊ लागली. भाऊ आर्कीटेक्ट प्रकाश पाटील त्यांना मदत करीत असत. त्यातून कामाचा एक दृष्टीकोन, अनुभव मिळाला.

पूर्वी पाटबंधारे विभाग स्वत: धरणाचे डिझाईन काढून नंतर बांधकाम करण्यासाठी कंत्राटदारांना देत. नंतर कंत्राटदार त्यानुसार कामे करत असत. 1998 मध्ये तापी खोरे विकास महामंडळ स्थापन झाल्यावर कामे ही डिझाईनसह कंत्राटदारांना दिली जाऊ लागली.कंत्राटदारांना डिझाईनची माहिती नसायची. त्यामुळे धरणांच्या कामाचे डिझाईन काढण्याचे काम प्रकाश पाटील यांच्याकडे येऊ लागले. मातीचे धरण, दगडी धरण, कालवे, धरणांचे गेट अशी अनेक कामांची डिझाईन करून तयार करून ते शासनाची मान्यता घेऊ लागले. जळगाव जिल्ह्यातील बहुतेक धरणांचे डिझाईन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील 363 धरणांचे डिझाईन त्यांनी आतापर्यंत केले आहे. हे कमी की काय म्हणून राजस्थान, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे देखील त्यांनी कामे केलीत. आता पर्यंत तीनशेवर कामे ही पूर्ण केलेली आहेत. राज्यात पाच सिंचन महामंडळे स्थापन झाल्यानंतर कामांना गती आली. निधी उपलब्ध झाला. प्रशासकीय कामांना वेग आला पण या घाईत काही चुकीचे निर्णय घेतले गेले, चुकीच्या तांत्रिक घटना घडल्या. उदा. धरणातील पाण्याची उपलब्धता, धरणाची जागा निश्चिती, धरणाचा पाया, धरणासाठी योग्य जागा आहे काय हे पाहिले गेलेच नाही. वास्तविक पाहता बजेट नुसार निविदा काढणे गरजेचे आहे

आज जलसंपदाचे बजेट दहा हजार कोटींचे आहे आणि कामे मात्र एक लाख कोटींची सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही धरणासाठी पुरेसा निधी मिळत नाही. कामे अपूर्ण राहतात, सतत भाववाढ होत असल्याने धरणांच्या किमती वाढत असतात. 20़-25 वर्षे झाली तरी धरण अपूर्ण राहते. ते अंतीम टप्प्यापर्यंत जाऊ शकत नसल्याचे विदारक सत्य प्रकाश पाटील मांडतात. जळगाव जिल्ह्याचा पूर्व आणि पश्चिम असमतोलाकडे ते लक्ष वेधतात. पूर्व भागात मधुकरराव चौधरी, प्रतिभा पाटील, जि.तु.महाजन, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यासारखे प्रभावशाली नेते होते तर पश्चिम भागत के.एम.बापू पाटील वगळता कुणी प्रभावशाली नेता झाला नाही. त्यामुळे पश्चिम भागात गिरणा धरण वगळता एकही मोठे धरण झाले नाही. निम्न तापी प्रकल्प, शेळगाव बॅरेज, सात बलून बंधारे झालेच नाहीत.

बजेट 10 हजार कोटींचा, कामे 1 लाख कोटींची राज्यात पाच सिंचन महामंडळे स्थापन झाल्यानंतर कामांना गती आली. निधी उपलब्ध झाला. प्रशासकीय कामांना वेग आला पण या घाईत काही चुकीचे निर्णय घेतले गेले, चुकीच्या तांत्रिक घटना घडल्या. पाण्याची उपलब्धता, धरणाची जागा निश्चिती, धरणाचा पाया, धरणासाठी योग्य जागा आहे काय हे पाहिले गेलेच नाही. वास्तविक पाहता बजेट नुसार निविदा काढणे गरजेचे आहे. आज जलसंपदाचे बजेट दहा हजार कोटींचे आहे आणि कामे मात्र एक लाख कोटींची सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही धरणासाठी पुरेसा निधी मिळत नाही. कामे अपूर्ण राहतात, सतत भाववाढ होत असल्याने धरणांच्या किमती वाढत असतात.

गिरणेच्या 160 किमी लांबीत पाणी भरले गेलेच नाही. ही कामे झाली असती तर अमळनेर, धरणगाव, पारोळा, पाचोरा, जळगाव, एरंडोल, भडगाव या तालुक्यांना लाभ झाला असता. आज तापीचे 250 टीएमसी पाणी गुजराथला वाहून जाते. पण त्या बाबत कुणी गंभीरपणे घेत नसल्याची खंत प्रकाश पाटील व्यक्त करतात.पश्चिम महाराष्ट्रात सर्व लोकप्रतिनिधी विकास कामांसाठी एकत्र येतात, आपल्याकडे मात्र केवळ न केलेल्या कामांचे क्रेडीट घेण्याची स्पर्धा असते असे सांगत नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारच्या विविध योजनात प्रकल्प आणण्यासाठी ताकद लावणे गरजेचे असल्याचे मत ते व्यक्त करतात. जलसंपदा विभागाने मेरीट नुसार कामांना प्राधान्य दिले पाहिजे.

काही ठिकाणी कमी खर्चात धरणे होऊ शकतात पण मतदारसंघ कुणाचा, काम कुणाचे यालाच प्राधान्य देता कामा नये, कामानुसार निधी वितरीत व्हावा. आज काम पूर्ण होण्यासाठी निधी आणण्यासाठी व्हीजन हवे, त्यात आपण कमी पडतो असे निरीक्षण त्यांनी मांडले. जळगाव शहराला व्यापारी पोटेंशियल आहे पण नागरी सुविधा नाहीत. 1985 मध्ये जळगाव हे नाशिक औरंगाबादपेक्षा औद्योगिक दृष्टया पुढे होते पण नंतर 35 वर्षात जळगावचा औद्योेगिक विकास झाला नाही, नागरी सुविधा दिल्या गेल्या नाहीत, याकडे ते लक्ष वेधतात.

संपर्क –

मो. 9822018058/9545557080

Email : [email protected]

facebook :Er.Prakash.R.Patil

Instagram: @er.prakash.r.patil

Twitter : @prpatilengneer

- Advertisment -

ताज्या बातम्या