Blog : कोविड-१९ यासारख्या विषाणूपासून उपजत बचावात्मक प्रक्रिया

Blog : कोविड-१९ यासारख्या विषाणूपासून उपजत बचावात्मक प्रक्रिया

न्यूबानिक प्लेग, अंथरॅक्स, स्वाईन फ्लू, डेंग्यू ,पटकी-कॉलरा आणि आताची कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी. मृत्यूच्या थैमानाचे कालचक्र मानवाने अनुभवले आहे. साथी ्चा प्रकोप इतका विद्व्हणसक अस्तोकी त्याने संपूर्ण मानवी जीवन अस्तावस्त होते. समूहमन भायकंपित होते. सामाजिक नियमन उल्मळून पडते. सर्वच साथीच्या आजारात मृत्यूचे भय हीच मूलभूत भावना दिसते. मानवाला मृत्यू अटळ आहे ही जाणीव असते. म्हणून मानव संपत्ती प्राप्त करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करते.

भौतिक सुखाच्या क्षणिक आनंद उपभोगात डुंबून जाते. “मृत्यु एक आभास आहे”. “आत्मा अमर आहे”. अश्या धारणा बाळगून व मृत्युपश्चातच्या जीवनाची कल्पना करून व्यक्ती स्वतःला मृत्यूच्या भयातून मुक्त करण्याचा प्रयत्न करते. आर्नेस बेकर1973 यांनी लिहिलेल्या denial of the death पुस्तकात मृत्यूविषयी वास्तव विवेचन केलेले आहे.त्यांच्या मते मृत्यूची भीती हीच भावना मानवी असुरक्षिततेचा वैश्विक व अंतिम स्रोत आहे .जगप्रसिद्ध मनोविश्लेषक सिग्मंड फ्रॉइडच्या मते दमित लैंगिक भावना व मृत्यूचे भय हेच मानवी वर्तन संघर्षाचे मूळ स्त्रोत असल्याचे त्याने प्रतिपादन केलेले आहे.

मृत्यू टाळण्यासाठी मानवात उपजतच दोन प्रकारच्या वर्तन प्रतिक्रिया आढळतात.

१) वर्तन रोगप्रतिरोध प्रणाली २) मानसिक रोगप्रतिरोध प्रणाली. वर्तन प्रतिरोध प्रणाली ही संकल्पना शालर यांनी मांडली आहे. मानवात कोणत्याही धोक्यापासून स्वसंरक्षणात्मक प्रथम ची प्रतिक्रिया (फर्स्ट लाईन डिफेन्स ) म्हणून वर्तन प्रतिरोध प्रणाली सक्रिय झालेली दिसते. व्यक्ती नको असणाऱ्या वूग्र-घाणेरड्या गंधा पासून स्वतःला दूर ठेवणे, कडू अन्न सेवना पासून स्वतःला वाचवने. विषारी अन्न खाल्यास वमन करणे. व्यक्ती संसर्गजन्य आल्यापासून स्वतःला दूर ठेवणे आदी वर्तन प्रतिक्रिया करतात. संभाव्य धोक्यापासून वाचवण्याच्या उर्मीतून परिषीत राजाने पाण्यात एका खांबावर महाल बांधला व सर्पदंशा पासून वाचण्याचा प्रयत्न केला. प्लेगच्या विषाणू पासून वाचण्यासाठी सुलतान महम्मद कुली कुतुबशहाने १५९१मध्ये चारमिनारची निर्मिती केली.या उदाहरणातून व्यक्तीची वर्तन प्रतीरक्षा प्रणाली व्यक्त होते.साथीच्या परिस्थितीत स्वसंरक्षणाचा एक भाग म्हणून अनोळखी अथवा परकीय व्यक्ती विषयी द्वेषभाव अथवा अतार्किक भय ज्याला झेनोफोबिया असे म्हणतात ते निर्माण झालेले दिसते. हाही वर्तन प्रतिरक्षा प्रणलीचाच भाग आहे.

● २) मानसिक रोगप्रतिरोध प्रणाली :- शरिरात विषाणूl-जिवानिंनी प्रवेश केल्यास आक्रमक पांढऱ्या पेशी जिवाणू नामोहरण करून नष्ट करतात.याशिवाय विषाणूंचा नायनाट करण्यासाठी मेंदूत मायक्रोग्रियल पेशी असतात.त्यांचे कार्य मेंदूत नवीन न्युरान वाढवणे आणि मेंदू दुखापत दूर करण्याचा प्रयत्न करणे हे असते.दुसऱ्या प्रकारच्या मायक्रोग्रील पेशी मेंदूत प्रवेशित विषाणू-जिवाणू ना ठार करतात. मायक्रोग्रिल पेशी एखाद्या राखीव सौन्या सारख्या असतात.त्यांची आवश्यकता नसेल तेव्हा त्या निष्क्रिय असतात पण एकदा विषाणू जिवाणू शरीरात प्रवेशित झाल्यास त्यांच्यात नाट्यमय बदल होतो त्यांच्या आकारात बदल होतो त्या सक्रिय होऊन शरीरात आवश्यक त्या ठिकाणी जातात आणि विषाणूंना मारण्यासाठी रसायनांचा संच करतात.

● मायक्रोगील पेशी च्या प्रतिपिंड निर्मितीसाठी सकारात्मक विचारांची, दुर्दम्यआशावादाची आणि रोगनंप्रती लढण्याची प्रखर इच्छाशक्तीची चालना पेशींना सक्रिय करतात व व्यक्ती रोगमुक्त होते. निराश, वैफल्यग्रस्त व जगण्याची उमेद गमावून बसलेली व्यक्ती रोगावर मात करू शकत नाही. म्हणून दुर्दम्य आशावाद-विचार रोगातून बरे होण्याचा विश्वास रोगाशी लढण्याची झुंजार वृत्ती व्यक्तीतील मायक्रोगिल पेशीं सक्रीय होऊन रोगांवर मात करतात. मात्र क्वचित या पेशी अती क्रियाशील होऊन आपल्याच शरीरातील पेशींना नष्ट करू लागतात.अशा bagi पेशींना “सायकोकाईन” असे म्हणतात. अशा बागी पेशींना नियंत्रणासाठी स्टेरॉईड चा वापर करावा लागतो.

सारांश व्यक्तीला साथीच्या आजारातून बरे होण्यासाठी 50 प्रतिशत औषधांचा व 50 प्रतिशत आशावादी विचारसरणी चा भाग महत्त्वाचा असतो. म्हणून दुर्दम्य आशावादी विचारसरणी बाळगून रोगमुक्त होता येते. हेंद्री च्या “अंतिम पान” “द लास्ट लीफ” कथेतील नायिका जेन्सी द्राक्ष वेलीवरील शेवटचे पान वादळपावसातही गळून पडत नाही म्हणून मी ही आता मरणार नाही अश्या विश्वासाने गंभीर न्यूमोनिया तून पूर्ण बरी होते. अनेक वर्षे कॅन्सरच्या आजारावर मात करणारा तरुण मुलगा खूप प्रयत्नांती प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ्कत्तरांच्च्या भेटीची आस ठेवून असतो पण दुर्दैवाने वादळ आल्याने डॉक्टरची भेट न झाल्याने शेवटी नैराश्याने तो तरुण मरतो. शेवटी सकारात्मक विचारच मेंदू पेशींना चालना देऊन व् व्यक्तींना रोगमुक्ता करतात.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com