Blog : निमित्त : नाशिक एज्युकेशन सोसायटीचे ९९ व्या वर्षात पदार्पण…

jalgaon-digital
6 Min Read

नाशिक | उमेेेश कुलकर्णी

आज कोरोनाची भयावह परिस्थिती असून पुन्हा कोरोनाचे संकट आपल्या समोर उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत नाशिक एज्युकेशन सोसायटी सामाजिक बांधिलकी जपणारी, शतक महोत्सवात पदार्पण करत असलेली नाशिक मधील अग्रगण्य संस्था नाशिक एज्युकेशन सोसायटी नुकतेच ९९ वर्षात पदार्पण करत आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना १ एप्रिल १९२३ मध्ये झाली…

नाशिकमधील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये तिचा समावेश होतो. नाशिकमधील काही अग्रणी संस्थांपैकी एक असलेली सेंट जॉर्ज हायस्कूलची स्थापना रेव्ह. शिंदे यांनी १९०८ मध्ये सध्याच्या पेठे हायस्कूल च्या ठिकाणी केली होती.

काही कारणांनी ती शाळा बंद पडल्या नंतर त्या जागेवर नाशिक एज्युकेशन सोसायटी ने १९२३ मध्ये शाळा सुरू केली. त्यावेळी लावलेल्या छोट्या वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. यात नानासाहेब अभ्यंकर यांच्यासह इतर समर्पित शिक्षकांनी, शहरातील रावबहाद्दूर गुप्ते व एम. आर. गोडबोले यांच्यासारख्या प्रमुख नागरिकांच्या मदतीने नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

सरकारने पेशव्यांच्या ताब्यातील ऐतिहासिक जागा संस्थेला शाळा साठी दिली त्यानंतर संस्थेने पेठे ज्वेलर्स या कुटुंबाच्या आर्थिक मदतीने त्याचे प्रशस्त माध्यमिक विद्यालयात रुपांतरण केले त्यानंतर १९४५ मध्ये त्या शाळेचे पेठे विद्यालय असे नामकरण करण्यात आले.

यावेळी गो. रा. गोडबोले हे शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते तर वि. अ. गुप्ते संस्थेचे पहिले अध्यक्ष नानासाहेब कर्वे कै. खैरे यांनी संस्थेची धुरा सांभाळली नंतर संस्थेच्या आजी माजी विद्यार्थी, देणगीदार यांच्या माध्यमातून संस्थेचा विस्तार झाला.

सारडा कन्या विद्या मंदिर मुलींची शाळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मभूमी त ति. झ. विद्यामंदिर भगूर, नवीन इंग्रजी शाळा ओझर ,सेठ ध.सा. कोठारी मुलींची कन्या शाळा नाशिक रोड माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको अशिक्षित असलेल्या व शेतीची पार्श्‍वभूमी असलेल्या स्वर्गीय रंगुबाई जुन्नरे यांनी शाळेसाठी जागा दान केली.

त्यामुळे त्या शाळेला रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम स्कूल असे नाव देण्यात आले. तसेच सागरमल मोदी प्राथमिक शाळा सुरू केले. नाशिकचा हळूहळू विस्तार होत गेला व अनेक नवीन उपनगरांमध्ये वसाहती झाल्या तेथील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेने शहरात आणखीन काही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंचवटीतील मेरी परिसरात १९७९ मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी ने नवीन शाळा सुरु केली.

ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांसाठी त्र्यंबकेश्वर वेळुंजे येथे आश्रम शाळा सुरू करण्यात आज संस्थेच्या बालवाडी आहेत. पहिलीपासून चौथीपर्यंत सेमी इंग्रजी भाषेचे ज्ञान देणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत. तर द्वारका मेरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारल्या आहेत.

संस्थेने कंप्यूटर शिक्षण दूरशिक्षण पदार्पण केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मदतीने संस्थेने पूर्वतयारी कोर्स,बी ए ,बी.कॉम आणि बी ए पत्रकारिता हे अभ्यासक्रम सुरू केले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची संलग्न स्टडी सेंटर संस्थेने सुरू केले संस्थेच्या सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयांमध्ये कंप्यूटर लॅब सुरू करण्यात आल्या आहेत.

संस्थेकडून अडवेंचर क्लब ,नेचर क्लब उपक्रम राबवले जातात. यासाठी पद्मश्री भवरलाल जैन, डॉक्टर माधवराव चितळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. यांच्या मदतीने जलसंधारण व पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ही मोठे काम केले आहे. या कार्याबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला.

आगामी वर्षापासून जुनिअर कॉलेज सुरू होणार आहे. जुन्नरे शाळेची भव्य इमारत उभी असून विद्युत बिलाची बचत व्हावी म्हणून उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांच्या प्रयत्नाने सोलर पॅनल बसविण्यात आले. वेळुंजे येथील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व मुलांची सोयींसाठी अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर यांच्या प्रयत्नाने इंडियाबुल्स कंपनीच्या मदतीने सोलर पॅनल बसवून विजेची बचत करण्यात आली. इंग्रजी शाळेचे आश्रम शाळेचे आत्तापर्यंत दहावीचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.

९८ वर्षात संस्थेतील ज्ञानवंत शिक्षकांनी लाखो आदर्शवत विद्यार्थी घडवले आहेत. जे आज पोलीस, पत्रकारिता ,वैद्यकीय, कला, क्रीडा, अभिनय, शिक्षण, राजकीय, सांस्कृतिक सरकारी यंत्रणेत, परदेशात कार्यरत आहे.

स्काउट-गाइड सारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग व योगदान आहे. संस्थेच्या विविध शाळेतून उत्तम संस्कार घेऊन हजारो विद्यार्थी आज या करोनाच्या संकट काळात मोठया प्रमाणात समाजाची सेवा करण्याचे उत्तम प्रकारे कार्य करीत आहेत याचा अभिमान वाटतो.

नाशिक एज्युकेशन सोसायटी गेल्या 98 वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करीत असून. सध्या संस्थेच्या वेगवेगळ्या शाळेमध्ये 25 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत असून त्यांना साडेपाचशे शिक्षक व 350 सहाय्यक कर्मचारी काम करीत आहेत. आणखीन वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या व्यवस्थापन निवडीसाठी लोकशाही पॅटर्न या संस्थेत दहा वर्षे शिकवत सेवेत असलेले शिक्षक आपोआप संस्थेचे सभासद बनतात व त्यातूनच पुढे संस्थेचे व्यवस्थापन मंडळ निवडले जाते. एवढेच काय शिक्षकेतर कर्मचारी याच पद्धतीने संस्थेचे सभासद होतात ही परंपरा असलेली ओळख आहे.

हेमेन्द्रभाई कोठारी फाउंडेशन माध्यमातून इंग्रजी भाषेबाबत व विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. विविध देणगीदारांनी ठेवलेल्या ठेवी तून संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. तर संस्थेचे आदर्शवत कार्यवाह तथा मुख्याध्यापक कै. ब. चि. सहस्रबुद्धेनावाने जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येते.

सर्वांची एकमेकांची काळजी घेत देशावरील आलेले संकट दूर करावे शासनाच्या आदेशाप्रमाणे कोणतेही स्नेहमेळावा आयोजित न करता देशावरील संकट दूर करण्यासाठी विविध प्रकारचे सर्वतोपरी प्रयत्न हे संस्था पदाधिकारी करीत आहेत.

लॉक डाऊनच्या काळात सुद्धा संस्था पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मार्च 19 पासून ई. 5 वी ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी रिकॉर्डिंगच्या माध्यमातून संस्था पातळीवर ऑनलाइन शिक्षण प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.

तसेच विद्यार्थी व शिक्षक याना विविध विषयावर तद्य मार्गदर्शक व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहेत. आजी माजी शिक्षक,विद्यार्थी, पालक, हितचिंतक, शिक्षणविभाग, देनगीदार यांच्या सहकार्याने संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर,उपाध्यक्ष प्रा. दीलिप फड़के,चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेन्द्र निकम, विश्वस्त रमेश चांदवडकर, दीलिप पेठे, शिक्षक मंडळ अध्यक्षा प्रियंका निकम, उपाध्यक्ष नरेंद्र मोहिते, कार्यकारी मंडळ, शिक्षक मंडळ यांच्या मार्गादर्शनाने संस्था यशस्वी वाटचाल करत आहे.

उमेश कुलकर्णी – ९४२१६०९८९२

उपशिक्षक नाशिक एज्युकेशन सोसायटी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *