Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगआणि अमेरिका पाण्यावर धावू लागला..

आणि अमेरिका पाण्यावर धावू लागला..

काही अभ्यासकांच्या मते हे लोक ५००० वर्षे आधीपासून हया भूमीवर वास्तव्य करुन होते. जागतिकिकरणामुळे (Globalization) भारताने (India) गेल्या २० वर्षात जसा वेगवान व अकल्पनीय बदल अनुभवला तसेच काही हया रेड इंडियन्सचे (Red Indians) झाले होते. ज्या मिसिसिपी नदीच्या (Mississippi River) आधाराने रेडइंडियन्सच्या (Red Indians) अगणित पिढया जगल्या, फुलल्या आणि बहरल्या. तीच मिसिसिपी (Mississippi) प्रारंभी वसाहतवादयांसाठी सर्वात मोठा अडसर होती. अमेरिकेच्या भूमीवर (On American soil) सर्वप्रथम आलेल्या स्पॅनिश व फ्रेंच लोकांनी मिसिसिपीच्या (Mississippi) काठावर आपल्या वसाहती वसवल्या.

तिच्या एका काठावर न्यू स्पेन (New Spain) आणि दुस-या काठावर न्यू फ्रांस (New France) निर्माण झाले. हया दोन्हींना विभागणारी होती मिसिसिपी (Mississippi). वसाहतवादी अमेरिकेच्या भूमीवर (Land of America) पोहचले आणि वसाहती स्थापन करुन राहू लागले, तेंव्हा पासूनच त्यांनी रस्ते निर्माण करण्यास सुरवात केली होती. असे असले तरी अमेरिकेच्या तत्कालिन दळण-वळणात मिसिसिपी (Mississippi) आणि तिच्या उपनद्यांची भूमिका सर्वात महत्वाची ठरली. स्वस्त आणि जलद दळण-वळणासाठी जलमार्ग सर्वात सोयीचा होता. गंगेप्रमाणेच मिसिसिपीनेही (Mississippi) अनेक वेळा अनेक ठिकाणी आपला मार्ग बदलला आहे. मिसिसिपीने (Mississippi) आपल्या गाळाने तिच्या खो-यातील जमीन अत्यंत सुपीक बनवली होती. त्यामुळे शेतीमालाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असे. मिडवेस्ट (मध्य पश्चिम) अमेरिकेत यामुळे समृद्धी होती. सुपीक जमीन आणि मुबलक पाणी यामुळे मिडवेस्टमध्ये लोकसंख्येची घनता अधिक होती. १८२० सालात अमेरिकेतील २५ % लोकसंख्या मिसिसिपीच्या काठांवर वास्तव्य करत होती. भारतात (Indian) आपल्याला गंगा-यमुना (Ganga-Yamuna) खो-याच्या बाबतीत हेच दिसून येते.

- Advertisement -

हया खो-यातच देशातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेली आपल्याला दिसून येते. मिसिसिपीने (Mississippi) सुपीक जमीन, मुबलक पाणी आणि भरघोस उत्पादन देण्यासोबतच माल वाहून नेण्याची सोय देखील दिली होती. लाकडाच्या तराप‹यांचा वापर करुन मिडवेस्ट मधील शेतकरी आपला माल थेट न्यू ऑर्लिन्सपर्यंत पाठवत. अनेक पिढयांनी आपला माल वाहून नेण्यासाठी मिसिसिपीच्या (Mississippi) प्रवाहात तराफे तरंगवले होते. अर्थातच यामध्ये निग्रो गुलामांचे रक्त व घाम मिसिसिपीच्या पाण्यात (Mississippi Water) अधिक मिसळला असेल. असे असले तरी अमेरिकेच्या (America) एका राष्ट्राध्यक्षाने वयाच्या १९ व्या वर्षी शेतक-यांचा माल तराप‹यात वाहून नेण्यास मदत करुन स्वतःचा रोजगार मिळवला होता. हा राष्ट्राध्यक्ष (President) म्हणजे अब्राहम लिंकन (Abraham Lincon). मिडवेस्टमधून (Midwest) न्यू आर्लिन्सपर्यंत (New Orleans) शेतमाल घेऊन जाणा-या या तराप‹यांची एक मोठी गंमत होती.

मिसिसिपी (Mississippi) अमेरिकतून (America) उत्तर दक्षिण वाहते. न्यू ऑर्लिन्स (New Orleans) दक्षिणेला होते. त्यामुळे तराफे माल घेऊन प्रवाहाच्या उताराने अत्यंत कमी श्रमात न्यू ऑर्लिन्सच्या बाजारपेठेत पोहचत. तेथे गेल्यावर मात्र शेतक-यांना तराप‹यासह आपला माल विकावा लागे आणि पायी चालत पुन्हा आपल्या गावी परतावे लागे. कारण न्यू ऑर्लिन्सवरुन प्रवाहाच्या उलटया दिशेने मिडवेस्टकडे येणे शक्य नव्हते. तसेच शिडाच्या बोटी किमवा वल्हवायच्या बोटी उपलब्ध नव्हत्या. एकतर समुद्रासारखा वारा नसल्याने शिडाच्या बोटींचा देखील उपयोग नव्हता. गरज ही शोधाची जननी असते. अमेरिका हया राष्ट्राची निर्मितीच हरहुन्नरी लोकांनी केली असल्यामुळे अमेरिकेत (America) समस्या अगणित असल्या तरी हे आव्हानं पेलणा-या लोकांची कमतरता नव्हती. मिसिसिपी आणि तिच्या उपनद्यांवरील वाहतूकीतील समस्या पाहून त्यांचे निराकारण करण्याची कल्पना एका हरहुन्नरी माणसाच्या डोक्यात आली.

हा माणूस म्हणजे रॉबर्ट फुलटन (Robert Fulton) १४ नोव्हेंबर १७६५ पेनसिल्व्हेनियातील ‘लिटिल ब्रिटन’मध्ये (Little Britain) जन्मलेला रॉबर्ट फुलटन (Robert Fulton). हा एक अफलातून माणूस होता. वडिलांनी दुसरा विवाह केल्यामुळे आपली आई आणि भावंड यांच्या उदरनिर्वाहासाठी वयाच्या सतराव्या वर्षापासून आपल्यातील कौशल्याचा वापर करून पैसा कमवला. सहा वर्षे फिलाडेल्फिया येथे शिक्षणासोबतच त्याने चित्रं,घरांचे व विविध यंत्रांचे नकाक्षे काढून देऊन अर्थाजन केले. आपण कमवलेल्या पैशातून त्याने आपल्या आईसाठी एक शेत (फॉर्म) विकत घेतले. त्यामुळे तिच्या जगण्याचा आधार निश्चित झाला. त्यानंतर वयाच्या २३ व्या वर्षी रॉबर्ट फुलटन युरोपला गेला. त्याने युरोपात २० वर्षे वास्तव्य केले.

१७७७ मध्ये म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षी लहानग्या फुलटनने (Robert Fulton) एक स्वप्न पाहिले होते. ते साक्षात उतरवण्याच्या आकांक्षेनेच तो युरोपला गेला होता. त्याचे हे स्वप्न होते, स्टीम इंजिन्स (Steam engines) आणि स्टीमबोट्स (Steamboats) बनवण्याचे. वाफेच्या शक्तीचा वापर करुन त्याकाळातील सर्वात जलद व सोयीस्कर समजली जाणारी जलवाहतूक अधिक वेगवान व सुखकर बनवण्याच्या ध्येयाने फुलटनला झपाटले होते. यासाठी त्याने वयाच्या १२ व्या वर्षी पेनसिल्व्हेनियाचे राज्य प्रतिनिधी विल्यम हेन्री यांची लॅकेस्टर येथे जाऊन भेट घेतली होती. हेन्री जेंव्हा इंग्लंडच्या दौ-यावर होते, तेंव्हा त्यांना जेम्स वॅट आणि त्यांच्या वॅट स्टीम इंजिनबद्दल माहिती घेता आली होती. १७८६ साली वयाच्या २३ व्या वर्षी एक अमेरिकन अभियंता आणि संशोधक म्हणून फुलटन इंग्लंडला पोहचला. १७९४ साली त्याने टगबोट निर्मितीचे पेटंट मिळवले. त्यानंतर त्याला जलवाहतूकीसाठी कालव्यांचा वापर करण्याच्या कल्पनेने झपाटले.

यासाठी त्याने कॅनॉल इंजिनियरींगचे (कालवे अभियांत्रिकी) चे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. त्याने बोट आणि कॅनॉल संदर्भात भरीव असे संशोधन याकाळात केले. १८०० साली नेपोलियन बोनापार्ट याने पाणबुडी बनवण्यासाठी रॉबर्ट फुलटनची (Robert Fulton) नियुक्ती केली. फुलटनने जगातील पहिली व्यावहारिक व उपयुक्त पाणबुडी ‘नॉटिलस’ ची निर्मिती केली. तसेच नौदलासाठी पाण्यातून मारा करणा-या जगातल्या पहिल्या ‘टॉर्पीडो’ चा म्हणजे पाणतीर किंवा जल क्षपणास्त्र याची निर्मिती केली. १८०६ साली फुलटन अमेरिकेला परतला. मायदेशी परतल्यावर फुलटनने जगातील पहिली व्यावसायिकदृष्टया यशस्वी स्टीमबोटची निर्मिती केली. त्याच्या या बोटीला ‘नॉर्थ रिव्हर स्टीमबोट’ (North River Steamboat) किंवा ‘क्लेरमोंट’ (Clermont) असे ही म्हणतात. १८०७ मध्ये फुलटनने आपली स्टीमबोट हडसन नदीत (Steamboat Hudson River) उतरवली. क्लेरमोंटचे पहिले प्रवासी होते पेनसिल्व्हेनियातील ‘बेथलहेम’ येथील सुप्रसिद्ध वकिल जोन्स आणि त्यांचा परिवार. जोन्स यांच्या सोबत त्यांची नवजात मुलगी अलेक्झांड्रा जोन्स ही होती.

योगायोग असा की याच अलेक्झांड्रा जोन्सने अमेरिकन गृहयुद्धात सैन्यासाठी स्टीमबोटमध्ये उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलात नर्स म्हणून अत्यंत गौरवास्पद कामगिरी केली. रॉबर्ट फुलटन यांच्या क्लेरमोंटचा हा पहिला प्रवास न्यूयॉर्क ते अल्बानी असा होता. ३०० मैलांचा(४८०किमी) हा प्रवास क्लेरमोंटने ३२ तासात पूर्ण केला. परतीचा प्रवास प्रवाहाच्या उलट दिशेने असल्यामुळे अल्बानीवरून न्यूयॉर्कला येण्यासाठी क्लेरमोंटला ६२ तास लागले. रॉबर्ट फुलटन यांच्या क्लेरमोंटाने इतिहास घडवला होता. त्याच्या स्टीमबोटच्या यशाने अमेरिकेतील प्रमुख नदयांवरील नदी वाहतूक आणि व्यापार बदलून गेला. स्टीमबोटच्या आगमनाने अमेरिकन शेतक-यांचे आयुष्य आमूलाग्र बदलून टाकले.

अमेरिकन दळण-वळण क्षेत्रातील एका क्रांतीपर्वाचा जनक म्हणून रॉबर्ट फुलटनचे नाव अमेरिकेच्या इतिहासात कायमचे सुवर्णाक्षरात नोंदवले गेले. दळण-वळणाचा वेग वाढल्याने आर्थिक चक्राचा वेग वाढणे अपरिहार्य होते. १८०७ मध्ये फुलटनच्या क्लेरमोंटने निर्माण केलेल्या जलसमृद्धी मार्गावर १८३६ सालापर्यंत ७५० स्टीमबोट वेगाने नदयांचे पाणी कापत अमेरिकेच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त करू लागल्या. जलवाहतूकीत अमेरिकेने संपूर्ण युरोपाला मागे टाकले. ७५० स्टीमबोटी ही संख्या म्हणजे तत्कालिन संपूर्ण युरोपच्या स्टीमबोटींच्या दुप्पट होती. स्टीमबोटींच्या वाफेने अमेरिकेला नवी उर्जा प्रदान केली होती. आता अमेरिका वाफेच्या जोरावर पाण्यावर धावू लागला होता. स्टीमबोटी आल्या आणि नदयांच्या काठावरची गावं-शहरं बदलू लागली. सेंट लुईस,मिसोरी अशा नदयांच्या नावानेच ओळखल्या जाणा-या गावांमध्ये धक्के आणि गोद्या तयार होऊ लागल्या. १८२० सालापर्यंत हया स्टीमबोटी एकावेळेस साधारणपणे २५० टन मालाची वाहतूक करीत असत. शेतीबरोबरच उद्योगधंदे देखील यामुळे बहरु लागले.

मिसिसिपीच्या पाण्यावर चालणा-या या स्टीमबोटींनी जणू काही तिच्या पाण्यालाच वेग दिला. न्यू ऑर्लिन्स आता केवळ शहर राहिले नाही. ते आता एक महानगर बनले. अमेरिकेतील तिस-या कमांकाचे एक सधन आणि समृद्ध असे महानगर म्हणून न्यू ऑर्लिन्स ओळखले जाऊ लागले. अमेरिकेच्या जलप्रवासाला समृद्धी देणा-या रॉबर्ट फुलटनला क्षयरोगाने ग्रासले होते. ज्या हडसन नदीवर त्यानं आपली पहिली स्टीमबोट फिरवली त्या हडसन नदीच्या पाण्यानेच त्याचा अखेर घात केला होता. १८१५ सालच्या जानेवारी महिन्याच्या थंडीतमध्ये एके दिवशी फुलटन आणि त्याचा मित्र एडिस एम्मेट गोठलेल्या हडसनच्या पात्रातून चालत घरी परतत होते. एका ठिकाण बर्फाच्या पातळ थरामुळे एम्मेट बर्फाखालील पाण्यात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी फुलटनने पाण्यात उडी घेतली. रक्त गोठवणा-या बर्फाळ पाण्याने भिजलेला फुलटन घरी आला. आधीच क्षयरोगाने ग्रासलेल्या फुलटनला न्यूमोनिया झाला. अखेर वयाच्या ४९ व्या वर्षी २४ फेब्रुवारी १८१५ रोजी मिसिसिपीच नाही, तर अमेरिकेतील सर्व नदयांना वेगवान प्रवासाची देणगी देणा-या रॉबर्ट फुलटनच्या जीवनाचा प्रवास न्यूयॉर्कमध्ये शेवटच्या मुक्कामावर पोहचला.

– प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या