गोड मागोवा

गोड मागोवा

मधुमेह अर्थात डायबेटीसवर काहीतरी उपचार होऊ शकतात, ही आशा जॅान रोलो या वैद्यकीय तज्ज्ञाने पल्लवित केली. 1870 सालच्या फ्रान्स-पर्शिया युद्धात अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. यातील अनेक डायबेटीसचे पेशंट होते. त्यांच्या लक्षणात अचानक सुधारणा झाली. अपोलोनाइेर बुचारडाट या डॉक्टरने उपासमार आणि डायबेटीसमध्येे सुधारणा हे दोन बिंदू कनेक्ट केले. त्याने स्वत: साखर आणि पिष्टपदार्थविरहित डाएट ट्रीटमेंट म्हणून द्यायला सुरुवात केली. म्हणूनच त्याला ‘आधुनिक मधुमेह उपचार शास्त्राचा’ जनक म्हणतात. डायबेटीसच्या ट्रीटमेंटची खरी सुरुवात केली ती फ्रेडरिक लन याने. तो म्हणतो, डायबेटीस हा आहारातील पिष्टपदार्थ हाताळताना थकलेल्या पॅनक्रियाजचा रोग आहे.

डॉ. नितीन पाटणकर, एमडी, डायबेटीस अँड डायबेटीस रिव्हर्सल ट्रीटमेंट

मधुमेह हा काही हजार वर्षांपासून माहीत असलेला रोग आहे. आजपासून 3572 वर्षांपूर्वी (इ. पूर्व 1550) इजिप्तमधील ‘इबेर्स पापारयस’ नावाच्या ग्रंथात ‘ज्या रोगात खूप लघवी होते असा रोग’ असे याचे वर्णन आहे. या रोगाने बाधित रोगी, बहुतेक वेळा (बहुतेक वेळा मुले आणि तरुण) अनाकलनीय कारणाने खंगत किंवा झिजत जाऊन मरत असत. हे खंगणे कितीही खायला दिले तरी थांबत नसे.

2272 वर्षांपूर्वी अपोलोनियस नावाच्या ग्रीक वैद्याने या रोगाला ‘डायबेटीस’ हे नाव दिले. अर्थ जुनाच, ‘खूप लघवी होणे’, पण आता त्याचे बारसे झाले. कुठल्याही रोगाला जर विशिष्ट नाव प्राप्त झाले तर सर्वांनाच बरे वाटते.

‘अंगावर पुरळ उठले पण कारण कळत नाही’ असे डॅाक्टरने सांगितले तर पेशंटला ते आवडणार नाही. डॉक्टरने निदान रोगाचा ‘डायग्नोसिस’ तरी करावा, अशी पेशंटची अपेक्षा असते. डॉक्टर गंभीर चेहरा करून, विचार केल्याचे भासवून पेशंटला सांगतात, बहुतेक इडिओपॅथिक पर्प्यूरा असावा. हे ऐकून पेशंट ‘आयडेंटी क्रायसिस’मधून बाहेर येतो.

खरेतर इडिओपॅथिकचा अर्थ ‘ज्याचे कारण माहीत नाही असा’ आणि पर्प्यूरा म्हणजे पुरळ. पण हे नाव कळले की पेशंटला फी दिल्याचे वाईट वाटत नाही. घरी जाऊन मला ‘इडियोपॅथिक पर्प्यूरा’ झाला आहे असे सांगून भाव खाता येतो. कुठच्याही रोगात काहीतरी पथ्य पाळण्याची प्रथा असते. ही पथ्ये वगैरे नक्की काहीच ठाऊक नसल्याने उगाच लिंबू आणि डाळ खाऊ नका, शेपू पण नको असे काहीतरी पथ्य सांगतो. पेशंट अभिमानाने डॉक्टरनी मला शेपू अ‍ॅव्हॉईड करायला सांगितला आहे, असे सांगत फिरतो.

त्या बिचार्‍या अपोलोनियसवर असाच प्रसंग ओढवला असावा. त्याने ‘डायबेटीस’ हे नाव दिले. अर्थ काही वेगळा नाही, पूर्वीचाच - जास्त लघवी होणे. त्यानंतर 1925 वर्षे उलटली. साल होते 1675. याकाळात ब्रेनला इजा झाल्यानंतर डायबेटीसची लक्षणे दिसतात म्हणजे ‘खूप लघवी होते’ हे लक्षात आले होते. ही लघवी गोड नसते, हेही लक्षात आले हेते. थॅामस विलीस नावाच्या डॉक्टरने ब्रेनला इजा होऊन जी लघवी होते ती अगोड असते, ब्लँड असते म्हणून त्याला ‘डायबेटीस इनसिपिडस’ हे नाव दिले आणि गोड लघवीला ‘मेलिटस’ म्हणजे मधासारखी असे नाव दिले. तेव्हा सन 1675 पासून ‘डायबेटीस मेलिटस’ हे नाव रूढ झाले.

सन 1776 साली मॅथ्यू डॉबसन नावाच्या इंग्रज डॅाक्टरने लघवीचा गोडवा हा त्यातील ‘साखरे’मुळे येतो हे सिद्ध केले. त्याचकाळात रोग्याचे रक्तदेखील गोड असते हे कळून आले. रक्त आणि लघवी चवीला गोड असतात हे कसे शोधले ती कथा सांगत नाही.

सन 1797 पर्यंत डायबेटीसवर उपचार असा नव्हताच. डायबेटीसच्या लक्षणात काही सुधारणा दिसू शकतात ही शक्यता निर्माण केली ती जॉन रोलो नावाच्या स्कॉटिश डॉक्टरने. कार्बोहायड्रेटविरहित फक्त मांसाहार केला तर डायबेटीसची लक्षणे सुधारू शकतात हे त्याने दाखवून दिले.

डायबेटीसवर काहीतरी उपचार होऊ शकतात, ही आशा जॅान रोलोने पल्लवित केली. 1870 सालच्या फ्रान्स-पर्शिया युद्धात अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. यातील अनेक डायबेटीसचे पेशंट होते त्यांच्या लक्षणात अचानक सुधारणा झाली. अपोलोनाइेर बुचारडाट या डॉक्टरने उपासमार आणि डायबेटीसमध्येे सुधारणा हे दोन बिंदू कनेक्ट केले. त्याने स्वत: साखर आणि पिष्टपदार्थविरहित डाएट ट्रीटमेंट म्हणून द्यायला सुरुवात केली. म्हणूनच त्याला ‘आधुनिक मधुमेह उपचारशास्त्राचा’ जनक म्हणतात.

अपोलोनाइेर बुचारडाट हे नाव उच्चारण्यास कठीण म्हणून त्याचा नामोल्लेख कुणी करत नसावेत. 1889 साली जोसेफ वॉन मेरिंग आणि ऑस्कर मिन्कोवस्की यांनी पॅनक्रियाज काम करेनासे झाले तर डायबेटीस होतो हे दाखवून दिले. 1910 साली एडवर्ड शार्पी-शॅफर याने या पॅनक्रियाजमधील काही विशिष्ट पेशींची बेटे असतात. या इन्सुलामध्ये तयार होणार्‍या हार्मोनच्या कमतरतेमुळे डायबेटीस होतो हे सिद्ध केले. या हार्मोनला ‘इन्सुलामध्ये तयार होते’ म्हणून इन्सुलिन हे नाव मिळाले.

डायबेटीसच्या ट्रीटमेंटची खरी सुरुवात केली ती फ्रेडरिक लन याने. तो म्हणतो, डायबेटीस हा आहारातील पिष्टपदार्थ हाताळताना थकलेल्या पॅनक्रियाजचा रोग आहे. त्याने 1000 कॅलरी डाएट विथ लेस दॅन 10 ग्रॅम कार्ब असा डाएट चालू केला.

तो पेशंटना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करून सकाळी सात ते रात्री सातपर्यंत फक्त कॉफी आणि माफक प्रमाणात व्हिस्की देत असे. युरीनमधून साखर वाहणे बंद झाले की पेशंट डिश्चार्ज घेई आणि अ‍ॅलन्स डाएट चालू ठेवी. हजारो लोकांना या पद्धतीने फायदा झाला.

त्यावेळेस टाईप 1 डायबेटीस आणि टाईप 2 डायबेटीस याची जाणीव नसल्याने अनेक टाईप वन डायबेटीस झालेले रुग्ण अ‍ॅडमिट होऊन, डाएट करत आणि त्यांना काहीही फायदा होत नसल्याने अ‍ॅलनवर प्रचंड टीकाही होत होती.

डॉ. एलियट जॉस्लिनने अ‍ॅलनची पद्धती वापरून अनेकांचे प्राण वाचवले. त्याने टाईप 1 सारखी लक्षणे दिसल्यास ‘माझे उपचार तुझ्यासाठी नाहीत’ हे सांगून त्यांची बोळवण करी. त्यामुळे त्याचा सक्सेस रेट खूप चांगला होता. त्याने हार्वर्डमधून शिक्षण घेऊन पूर्ण लक्ष डायबेटीसवरील उपचारांवर केंद्रित केले. आजही हार्वर्डमधील ‘जॉस्लिन डायबेटीस क्लिनिक’ हे जगातील अग्रगण्य डायबेटीस उपचार आणि संशोधन केंद्र समजले जाते. त्याने लिहिलेले ‘द ट्रीटमेंट ऑफ डायबेटिस मेलिटियस’ हे पुस्तक अनेक अवृत्ती आणि लेखक बदलूनही डायबेटीसचे बायबल समजले जाते आणि डॉ. जॉसलिन हा जगातील पहिला डायबेटीस स्पेशालिस्ट समजला जातो.

त्याने अ‍ॅलनची ट्रीटमेंट वापरून अनेक रुग्ण बरे झाल्यानंतर केलेले एक विधान फार प्रसिद्ध आहे. आम्ही डायबेटीस रिव्हर्सलसाठी ते वाक्य पाया म्हणून वापरतो.

ढहश ींशािेीरीू शिीळेव ेष र्ीपवशीर्पीीींळींळेप रीश हशश्रि ळप ींहश ीशींळीशाशपीं ेष वळरलशींशी. डरीींळपस ुळश्रश्र िीेलरलश्रू लश रलज्ञपेुश्रशवसशव लू रश्रश्र री ीींशरीांशपीं षेी वळरलशींशी रषींशी पशु शश्रशाशपीं ळ हर्रींश लेपर्वीलींशव.

मला डायबेटॉलॉजिस्ट म्हणून कुणी कधी गोत्र विचारलेच तर

जॉस्लिन गोत्रोत्पन्न: नितीन शर्माहम् ।

असेच म्हणावे लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com