Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक फिचर्स ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : उपेक्षितांना वेगळेपण देणारी ‘मनमिलन’

Share

नाशिक : मनमिलन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष, तृतीयपंथी, आणि वारंगणा या समाजासाठी मागील दोन वर्षांपासून काम केले जात असून, भूमिगत आयुष्य जगणाऱ्या आणि समाजाने नाकारलेल्या या घटकांसाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम या संस्थेमार्फत राबवला जात आहे. समाजातील काही समूह उजळ माथ्याने जगू शकत नाही कारण त्यांच्यात सर्वसामान्यांपेक्षा वेगळेपण असते.

पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष म्हणजे एम.एस.एम, काही शारीरिक जीवशास्त्रीय वेगळेपणा असलेले तृतीयपंथी व उदरनिर्वाहाची अन्य साधने बंद झाल्याने केवळ परिस्थिती मुळे शरीरविक्री करणाऱ्या स्त्रिया म्हणजेच वारंगणा या समाजाच्या प्रगतीसाठी आसावरी देशपांडे यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून मनमिलन बहुउद्देशीय सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत उपेक्षितांच्या समस्या मांडल्या जातात. या विशिष्ट समाजाला मुख्य प्रवाहात आणणे त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करणे यासाठी किस्मत बाग, व्यापारी संकुल त्रंबक रोड येथील मनमिलन संस्थेचे कार्यालय सुरू आहे. केवळ समाजात त्यांच्या संबंधाला धारणा नसल्याने हे लोक भूमिगत आयुष्य जगत होती त्यांना आज या संस्थेमध्ये आशेचा किरण सापडला आहे.

नाशिक जिल्ह्यात आज सातशेहून अधिक समलैंगिक लोकांची नोंद आहे. याव्यतिरिक्त नोंदणी न झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे. अशाप्रकारे आम्ही एमएसएम (पुरुषांसोबत संबंध ठेवणारे) आणि ट्रान्सजेंडरपर्यंत पोहोचलो. त्यातून एचआयव्हीचा अटकाव होण्यासाठी काम सुरू केले. समलैंगिक आणि ट्रान्सजेंडरर्समध्ये जागृती करण्यासाठी त्यांच्यातील शिकलेले, नेतृत्वाचे गुण असलेले लोक निवडले आणि समलैंगिकांच्या समूहासोबत कामाला प्रारंभ झाला. त्यांचे समुपदेशन, आरोग्याची काळजी घेणे असे काम सुरू केले. सन २०१० मध्ये सेक्सवर्कर्स महिलांची पहिली दिशा महिला संघटना तर सन २०१२ मध्ये मनमिलन ही तृतीयपंथी, गे, ट्रान्सजेंडर, बायसेक्सुअल्स यांच्यासाठी कार्य करणारी संघटना स्थापन झाली.

‘दिशा’ आणि ‘मनमिलन’ या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कामातून पुढे आलेल्या नोंदणीकृत संस्था आहेत. नमिलन ही कम्युनिटी ने स्थापन केलेली कम्युनिटीबेस ऑर्गनायझेशन आहे. नाशिक शहर आणि छोट्या गावातील समलैंगिक, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष, तृतीयपंथी, टी.जी.यांच्या आरोग्यविषयक सेवा, सामाजिक हक्क, सदर समुहास मानवी अधिकार मिळवून देणे त्यांचे जीवनमान उत्कृष्ट करण्यास मदत करणे, एच.आय.व्ही. आणि एड्स या बद्दल समाजात जनजागृती करणे व समाजातील भेदभाव नाहीसा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न मनमिलन संस्था करते.

सुरुवातीला संस्थेला काम करतांना बऱ्याच अडचणी आल्यात. संस्थेने तृतीयपंथी, समलैंगिक, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष शोधले आणि त्यातून एच.आय. व्ही. चा अटकाव होण्यासाठी काम सुरू झाले. तृतीयपंथी ,एम.एस.एम. यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी संस्थेने या विषयातील थोडे फार ज्ञान असलेले आणि उत्तम नेतृत्व करणारे काही तज्ञ निवडले आणि या लोकांच्या समुहासोबत कामाला प्रारंभ करण्यात आला. समलैंगिकांचे शहरात काही क्रुसिंग पॉइंट आहेत. या पॉइंट्सचा शोध घेऊन तिथे निरोध वाटप करणे त्यांचे समुपदेशन व आरोग्याची काळजी घेणे अशा प्रकारे संस्थेच्या कामकाजाची सुरुवात झाली.

काही व्यक्तींमध्ये जीवशास्त्रीय कारणांमुळे नैसर्गिक वेगळेपणा असतो म्हणजेच त्यांच्यात समलैंगिक आकर्षण होते आहे तेव्हा असे पुरुष निराश होतात त्यांनी आपल्या घरी या विषयाबद्दल सांगितल्यावर घरचे देखील या पुरुषांना नाकारतात अशा पुरुषांचे प्रश्न समजून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न संस्था करत असते.

सर्वसामान्य मुलगा किंवा मुलगी यांच्यात कुठलाही जीवशास्त्रीय बदल झालेला नसल्याने त्यांना वेगळेपणाचा अनुभव येत नाही. पण तृतीयपंथी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष, वारांगणा यांना स्वतःशी आंतरयुद्ध करत असताना समाजाशीही लढावं लागत, परंतु, हे अतिशय अवघड झाल्याने त्यांना कुठल्यातरी आधार गटाची गरज असते. हा आधार गट नाशिकमध्ये मनमिलन संस्थेच्या माध्यमातून स्थापन झाला आहे. अलीकडे नांदगाव, मनमाड, मालेगाव या शहरात मनमिलन संस्थेने आपले कार्यालय स्थापन केले आहे.

तृतीयपंथी लोक मनाने अत्यंत प्रेमळ असतात, हे लोक विशिष्ट सण दिवाळी, दसरा, होल तसेच लग्नसमारंभ, वास्तुशांती व अन्य काही समारंभाच्या दिवशीच बधाई मागत असतात. याव्यतिरिक्त इतर दिवशी तृतीयपंथी लोक बधाई मागत नाही. समाजातील काही लोक पैशाच्या हव्यासापोटी साडी घालून बधाई मागतात. अशा कृत्यांमुळेच तृतीयपंथी समाजाची नाचक्की होते. समाजातील या फसवेगिरी करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. खरे तृतीयपंथी लोक कधीच लोकांना त्रास देऊन बधाई मिळवत नाही. सामान्य लोक स्वइच्छेने जेवढी बिदागी देतील तेवढीच स्वीकारत असतात. मात्र समाजाने त्यांना दूर करून त्यांच्याविषयी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष, तृतीयपंथी लोक सामान्य लोकांपेक्षा वेगळे असले तरी त्यांच्यात एक प्रकारचा सर्जनशीलपणा असतो. हा सर्जनशीलपणाच त्यांना सामान्यांपेक्षा वेगळा करतो. या वेगळेपणाच्या जोरावरच या समूहातील काही लोक उच्च पदावर कार्यरत आहेत. या लोकांचे हावभाव जरी सामान्य लोकांसारखे नसले तरी त्यांच्यात सामान्यांसारखे बौद्धिक काम करण्याची क्षमता असते.

सामान्य लोकांनी तृतीयपंथी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष, वारंगणा यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. असे झाले तरच हे लोक समाजात नक्कीच सन्मानाने जगू शकतील.

 

आसावरी देशपांडे (मन मिलन संस्थेच्या मार्गदर्शिका )
सिव्हिल हॉस्पिटल मधून आमच्या संस्थेत एका मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या मुलाला आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे देखील माहित नव्हते. संस्थेमार्फत वारंवार त्याचे समुपदेशन करण्यात आले. नंतर त्या मुलाने मुंबई काही वर्ष मॉडेलिंग केली व आता तो नाशिकच्या एका बी.पी.ओ. मध्ये कार्यरत आहे.

दिशा पिंकी शेख 
मी आज ज्या पदावर आहे त्याचे अस्तित्व मिळवण्याची दिशा मला मन मिलन संस्थेने दाखवली आहे. त्यामुळेच मी आज सक्षम पदावर कार्यरत आहे.

( संकलन : अनिरुद्ध जोशी )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!