blog : क्लासिक चित्रवाणी जाहिरातींचा सुवर्णकाळ

0

जाहिरातीला ६५ वी कला म्हणून ओळखले जाते. अत्यंत कमी शब्दात विलक्षण प्रभावीपणे एखादी वस्तू अथवा सेवांची माहिती देणे म्हणजे जाहिरात होय. हे माध्यमं खरंतर सृजनाचे माध्यम आहे.  पूर्वी माध्यमांसाठी आर्थिक स्त्रोत म्हणून पूरक असलेले जाहिरातींचे विश्‍व आजच्या यूगात  स्वतंत्र मीडिया झाला आहे. (ज्याला ऍड आणि पीआर मीडिया म्हणतात) जाहिरातींची कॉपी (संहिता),त्याचे गेयगीत(जिंगल्स) संगीत, मनावर ठसणारे घोषवाक्य(स्लोगन) म्हणजे सर्वार्थाने सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना ठरावे.

इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर म्हणजे १९८४ नंतर टेलिव्हिजनचे युग अवतरले. सन १९८४ ते १९९३ या काळात खाजगी चित्रवाणी वाहिन्या नव्हत्या. केवळ ‘दूरदर्शन हेच टीव्ही माध्यम होते. नाही म्हणायला त्याच्या फार पूर्वीपासून नभोवाणीवरील जाहिराती लोकप्रिय होत्या. परंतु त्यामध्ये दृक-श्राव्यता नसल्याने त्यांच्यामध्ये दृश्याची परिणामकारता नव्हती. त्या तुलनेत दूरचित्रवाणीवरील(सरकारच्या आखत्यारीत असलेले दूरदर्शन हे एकमेव माध्यम होेते)जाहिरातींचा प्रभाव आणि प्रसार ८० च्या दशकात चांगला झाला.

त्या काळी दूरचित्रवाणीवरील जाहिराती फारशा ‘क्रियेटिव्ह’ नसल्या तरी त्यांचा जनमानसावरील प्रभाव प्रचंड होता. त्यातील काही जाहिराती तर आजही ज्याचे वय ४०शीच्या पूढे आहे अशा लोकांना चांगल्या लक्षात असतील.. सर्फ की खरीददारी मेही समझदारी है. ब…ब…..ब…..बल्ब…..जादा दिन चलनेवाला…ज्यादा दे उजाला ईसीई ब्लब ऑर इसीई ट्यूब….पूरे घर के बदल डालूंगा…..अशी एक छान जाहिरता होती….आज सीएफएल,एलईडीच्या जमान्यात कोण बल्ब, ट्यूब खरेदी करेल.? व्हीआयपी सुटकेची जाहिरातही छान होती… कल भी आज भी कला भी इन यादो का सफर रुकेना ना कही ‘व्हीआयपी’ असे ते जिंगल होते. बुलंद भारत की बुलंद तसवीर हमारा बजाज हमारा बजाज ही तर कुटुंबामध्ये इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर लोक बजाजची स्कूटरची खरेदी करत असे.

सायकल सोडून नवमध्यमवर्गींची नस ओळखून तयार केलेली लूनाची जाहिरात तर टिपीकल मिडलक्लास कुटुंबाजी झलक होती. त्यामध्ये राममुरारी हे कॅरेक्टर ऑफीसमध्ये लेट गेल्याने बॉसचे बोलणे खात असते आणि कामावरुन घरी उशिरा परतल्यामुळे पत्नीचे बोलणे खाते आणि मग लूना खरेदी केल्यानंतर त्याच्या जीवनात आनंद पसरतो या अर्थाची लुना करती पक्का वादा खर्चा कम मजबुती ज्यादा चल मेरी लुना ही जाहिरातही खूप गाजली. दिवाळीच्या वेळी हमखास पेंटच्या जाहिराती लागत त्यामध्ये ट्रॅक्टर, मेरोलॅक, एशियन पेंटसच्या जाहिराती असत.  ये तेरा घर ये मेरा घर हमारा अपना प्यारा घर दिवारे ऐसी खिल उठे लगे किसी की ना नजर! या एका सुरेख जाहिरातींने अनेकांच्या घरातील भिंतीसोबत मनालाही रंगीत केलेे…जब घर की रौनक बढनी हो दिवारो का जब सजना हो….नेरोलॅक ……ही एक कलात्मक जिंगलची जाहिरात आजही डोळयासमोर उभी राहते.

काय झाल बाळ रडत होते ग्राईप वॉटर दे त्याला तू लहान असताना मी तूला तेच देत होते ही नात, मुलगी आणि आजीची जाहिरात प्रभावी ठरली. यासह. निरमा वॉशिंग पावडर निरमा, धारा धारा शुद्ध धारा…..मसुडो मे जान तो दातोंकी शान विको…पान पराग पान मसाला, और मेरे लिये….? अटरली बटरली डिलिशीअस…अमूल……. ला…लारा…ला ही पाण्यामध्ये नाचणार्‍या तरुणीची लिरीलची कमर्शिअल यां जाहिरातींनी जनमानसावर प्रभाव टाकला……वर्लपूल, ग्लायकोडीन, गोल्डस्पॉट, डिगजॅम,सिंथॉल,रेमंण्ड, रेनॉल्ड, रोटोमॅक पेन, थम्स-अप, लिम्का, एनर्जी,कॅडबरी, एलआयसी, अमूल आइस्क्रिम, ही दूधयुक्त पेयाची जाहिरात, व्हिआयपी फ्रेंची अशा अनेक जाहिराती आल्या. अर्थात यामध्ये कधी हास्य, मानवी भावना तर कधी गेयता टाकून ती ग्राहकांच्या मनावर ते उत्पादन ठसवण्याचा प्रयत्न झाला.

मराठी रामदास पाध्येच्या बोलक्या सशाला घेऊन तयार केलेली कुर्रम कुर्रम लिज्जत पापड ही जाहिरात महिलांसह सर्वांनाच भावली तर ये फेव्हिकॉलका जोड है तुटेगा नही. या जाहिराती दीर्घकाळ स्मरणात राहिल्या.

सामाजिक जाहिरातींही तितक्याच प्रभाव होत्या.. त्यामध्ये हेलमेट घालण्याची आवश्यकता दाखवणारी…..मर्जी है आपकी आखिर सर है आपका ही हातोडीने नारळ फोडणारी जाहिरात प्रभावी ठरली. सामाजिक वनीकरण येता दारी… संसारा उद्ध्वस्त करी दारु बाटलीस स्पर्श नका करु. मानवरहित रेल्वे फलाटावरील वाहनांना रेल्वे क्रॉसिंगवर न जाण्याचा सल्ला देणारी जाहिरात, एक किंवा दोन बस्स…..ही कुटुंब नियोजनाची जाहिरात अशा जाहिराती आजही लोकांच्या लक्षात आहेत.

काळ बदला तसा जाहिरातीच्या सादरीकरणाचा फंडा बदलला. नव्वदच्या दशकात म्हणजे साधारणत: खाजगी चित्रवाहिन्यांचे यूग आल्यानंतर जाहिरातीत सर्जनशीलता, आधुनिक तंत्र आले. त्यामुळे त्या आधिक कलात्मक, प्रभाव आणि गये ठरल्या…. त्यामध्ये पॅक शॉट तंत्र आले…..या तंत्राचा वापर करुन पाण्याचा थेंब ग्लासातून पडताना त्याला १००० पटीने संथ दिसेल इतके हळू केले जाते. असे तंत्र दूध, पाणी. ज्यूस, कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातींमध्ये वापरले गेले. ओनिडाचा शेपटीचा राक्षस, वर्लपूलचा पेग्वीन, इंडियन एअरलाईन्स महाराजा, अमूलची नटखट गर्ल, पारले-जी बिस्कीटा वरील गोड मुलगा आजही दर्शकांना स्पष्ट आठवतो. कॉम्पलॅन हेल्थ ड्रिंकचा छोटा शाहिद कपूर आणि आयेशा झुल्का आज स्टारपदावर आहेत परंतु आय ऍम क्लॉम्पलॅन गर्ल-बॉय म्हणणारे ते छोटे आजही आठवतात.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड यांनी दृष्टीहीनावरची अभियन देव यांच्या जाहिरात कंपनीने तयार केलेली जाहिरात खूपच छान होती. यामध्ये एक व्यक्ती जीने उतरुन खाली येतांना दाखवलाय. अचानक इमारतीची वीज जाते. ती डोळस व्यक्ती वैतागून दुसर्‍या व्यक्तीचा आधार घेऊन जीने उतरुन खाली येेते. खाली उतरताच वीज येते आणि जेव्हा ती डोळस व्यक्ती स्वच्छ प्रकाशात बघते तेव्हा एक दृष्टीहीन व्यक्तीने तिला जिना उतरुन खाली आणून सोडलेले असते. ‘उघडा तिचे डोळे पाहू द्या तीला जगाकडे’ ही एक महिला सक्षमीकरणाची जाहिरात खूप प्रभावी ठरली. ९० च्या दशकात विश्‍व सुंदरीचा किताब जिंकणार्‍या ऐश्‍वर्या रॉयची नेत्रदानाची जाहिरात खूपच प्रभावी ठरली.

हॅप्पीडंट जाहिरात प्रसून जोशी या क्रियेटिव्ह दिग्दर्शकाने तयार केली होती. ती इतकी प्रभावी, सर्जनशील झाली की देशभरातून उत्पादनाला प्रचंड मागणी झाली त्यामुळे कंपनीला चार महिने ही जाहिरात बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. अमिताभ बच्चनची कुच्छ मिठा हो जाये…. क्यू की हर घर कूछ कहता है या जाहिरातींनी लोकांच्या पसंतीची पावती दिली.

९० च्या दशकातील कलात्मक, अभिनव जाहिरांतीच्या निर्मितीमुळे अलक पद्मसी, प्रल्हाद कक्कर, प्रसून जोशी, पीयूष पांडे, अभिनय देव या व्यक्ती एडगुरु म्हणून नावारुपाला आल्या. टिव्ही जाहिराती तयार करुन देणार्‍या लिंगटास, ओ एण्ड एम, निर्वाणा, जिनेसिस्, ब्लॅक मॅजिक या जाहिरात कंपन्या आपल्या कलात्मक जाहिरातींमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झाल्या.

आजच्या काळाला जाहिरातींचे यूग मानले जाते. कालानुरुप टिव्हीमाध्यमावरील जाहिरातींमध्ये मानवी भावना, प्रेम, आपुलकी, सर्वधर्मसमभाव, विनोदबुद्धी अशा गोष्टी दाखवल्या जातात… परंतु आज संंततीप्रतिबंधात्मक निरोधके, अर्ंतवस्त्रे, डियो-स्प्रे, साबण, शूजच्या जाहिरातीमध्ये किळसवणा प्रकारही दिसून येतो…..मात्र ८० आणि ९० च्या दशकातील सदाहरित जाहिरातीचा काळ आज नाही असे खेदाने म्हणावे लागेल.

-प्रिन्स ऑफ केव्हज् लॅण्ड

LEAVE A REPLY

*