Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Blog : अतिवृष्टीचे परिमाण आणि भारतीय शेती

Share

भारतीय शेती आणि भारताचे अर्थकारण अजूनही बहुतांशी मोसमी म्हणजेच हंगामी पावसावर अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या तापाने त्रस्त झालेल्या प्रत्येकालाच पावसाची आस लागलेली असते.

त्यामुळे हवामान खात्याकडून वर्तविल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. भारतातील १३० दशलक्ष हेक्टर पेक्षा जास्त अशी वेगवेगळ्या प्रकारची शेतजमीन मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे.

त्यामुळे देशाच्या २ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेत १५ टक्के वाटा असलेल्या शेती क्षेत्रावर, तर दोन तृतीयांश लोकसंख्येवर थेट शेतीवर अवलंबून आहे.

भारतामध्ये पावसाची खूप विविधता आपल्याला अनुभवायला मिळते. भारतात जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे, आणि तसंच, अतिशय कमी पावसाचं वाळवंटदेखील आहे. एखाद्या भागात पडणारा पाऊस हा, वारे अडविणारी झाडे, डोंगर, टेकड्या, पर्वत, तापमान, वायुदाब, बाष्पाचे प्रमाण, बाष्पीभवनाचा वेग, धूलिकण, वातावरणातली अस्थिरता, ढगांची रचना, स्थानिक आणि भौगोलिक परिस्थिती आदी अनेक घटकांवर अवलंबून असतो.

गेल्या ५० वर्षाच्या सरासरी नुसार मॉन्सून काळात देशात सरासरी ८९ सेंटिमीटर पाऊस पडतो. त्यात चार टक्के वाढ, घट (९६ ते १०४ टक्के पाऊस) झाली तरी हंगामातील पाऊस हवामान विभागाच्या वर्गीकरणानुसार सरासरी एवढा मानला जातो. देशात वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी सुमारे ७० टक्के पाऊस मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) पडतो.

कोणत्याही वर्षी सरासरीपेक्षा २४ टक्क्य़ांहून कमी पाऊस कोणत्याही वर्षी पडलेला नाही. म्हणजे, अगदी १९७२ च्या दुष्काळाच्या काळातही भारतामध्ये ७६ टक्के पाऊस पडलाच होता. पाऊस जरी नियमित येत असला तरी काही वेळा, वेगवेगळ्या घटनांमुळे तो कमी प्रमाणात पडतो.

‘आयएमडी’ (Indian Meteorological Department) ने वर्गीकरण केल्या प्रमाणे पाऊस ५० टक्क्य़ांपेक्षाही कमी झाला तर तो अल्पवृष्टि (स्कॅन्टी रेनफॉल), ९० टक्क्यापेक्षा कमी होणाऱ्या मॉन्सूनला अपुरा (डेफिसिएंट), ९० ते ९६ टक्के होणाऱ्या पावसाला सरासरीपेक्षा कमी (बिलो नॉर्मल), ९६ ते १०४ टक्के पावसाला सरासरी (नॉर्मल), १०४ ते ११० टक्के म्हणजे सरासरीपेक्षा जास्त (अबोव नॉर्मल) आणि ११० टक्क्यापेक्षा जास्त होणाऱ्या पावसाला जास्तीचा (एक्सेस) असा मानला जातो. हवामान खात्याच्या व्याख्येनुसार जेव्हा देशाच्या २० टक्के ते ४० टक्के भूभागात १० टक्के पेक्षा कमी पाऊस होतो तेव्हा दुष्काळ पडला असे म्हटले जाते.

कागदी आकडे पाहता दहा टक्के पेक्षा कमी पाऊस तो हि २० ते ४० टक्के भूभागात पडण्याची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे ‘आयएमडी’च्या व्याख्येनुसार भारतात दुष्काळ कधीच पडणार नाही. त्यामुळे दुष्काळ पडण्याची घोषणा देखील आयएमडी यापुढे कधीच करणार नाही. याउलट 5 टक्क्यांनी तफावत दाखवित दरवर्षी सरासरीच्या 95 ते 96 टक्के पाऊस होईल असे सांगणे आयएमडीला जास्त सोईचे आहे.

खरंतर दर तासाला पडणार्या पावसाचे पद्दतशीर वर्गीकरण केल्यास कोणत्या तासात किंवा तासाच्या भागात १०० मिलीलीटर या दराने पाऊस झाला म्हणजे ढगफुटी झाली हे आयएमडीला निट सांगता येऊ शकते. चोवीस तासात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त होणार्या प्रत्येक पावसाला हवामान विभाग अतिवृष्टी म्हणत आहे.

६५ मिलीमीटर पेक्षा पाऊस म्हणजे जास्त पाऊस (Heavy Rain), ६५ ते १२५ मिलीमीटर पेक्षा पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस (Very Heavy Rain), तर २५० मिलीमीटर पेक्षा पाऊस म्हणजे अत्यंत जास्त पाऊस (Extremely Heavy) अशी संकल्पना हवामान खाते (आयएमडी) वापरते.

ही पध्दती संदिग्ध, अपुरी, सदोष व गोंधळात टाकणारी आहे. त्या ऐवजी चोवीस तासातील कोणत्या तासात पाऊस झाला, दरतासाला किती मिलीमीटर पाऊस झाला हे वर्गीकरण हवामान खाते नागरीकांना सांगू शकले तर ते हवामान खात्याचे मोठे यश असेल. कारण दररोज व चोवीस तास सलग असा पाऊस क्वचितच एखाद्या ठिकाणी कोसळतो. शासकीय नियमाप्रमाणे एकाच दिवशी अथवा ठराविक काळात ६५ मिमी पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी झाल्याचे निकष लागू होतात.

पण पाऊस कमी असला तरी पिकांचे मोठे नुकसान अनेकदा होते. शेतकऱ्यांना पावसाच्या आपत्तीने नुकसान झाल्यास योग्य नुकसान भरपाई देणे देखील यामुळे शक्य होऊ शकेल.

  • लेखक : किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ 
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!