Blog : भारतातील देवभूमी ‘मुन्नार’

0

भारतातील कुठल्याही भागातल्या पर्यटकांचं लाडकं पर्यटनस्थळ म्हणजे केरळ. भारतातील देवभूमी जशी काश्मीर त्याचप्रमाणे केरळ ही आहे.

एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले रेखीव निसर्गचित्र, समुद्राच्या लाटा बॅकवॉटर, केळीच्या, नारळाच्या बागा, ताडाची उंच झाडे, चहाचे मळे, निरभ्र आकाश व अवचित येणारा पाऊस किती-किती निसर्ग छटा डोळ्यात साठवाव्यात. केरळ मधील सर्वात महत्वाचे व थंड हवेचे ठिकाण मुन्नार.

पेरियरहून, साधारण तीस-चाळीस किलोमीटर उंच उंच डोंगर रांगा वळणदार रस्ते, चहाचे मळे मुन्नार शहरात प्रवेश करेपर्यंत चहाचे मळे आपली सोबत करीत असतात. इथे पाऊस कधी पडेल याचा नेम नाही. म्हणजेच अचानक रिमझिम पावसाला प्रारंभ होतो.

सोबत थंडी व पाऊस फार सुखद अनुभव असतो. मुन्नारला येथील खास स्थळ म्हणजे एरावीकुलम नेशनल पार्क, अनामुडी पीक, मत्तुपेटी डॅम, टी म्युझिअम आणि चहाचे मळे. डॅम जवळ इको पॉईंट, बोट रायडींग करू शकतो.

कोची एअरपोर्ट पासून मुन्नारच अंतर साधारण १४० किलोमीटर आहे. पण एखाद्या सर्पाकार वळणदार रस्त्यावरून हे अंतर तीन ते चार तासात आपण कधी पार करतो हे आपणास जाणवतच नाही.

मुन्नार ज्या साठी प्रसिद्ध आहे ते आहे तेथील चहाच्या बागा, आम्हाला असे वाटले कि आम्ही एकदम जमिनीपासून आकाशात पोहोचलोत कारण आमचं रिसॉर्ट उंच ठिकाणी होतं तेथून मुन्नारच दर्शन अप्रतिम व अदभुत दिसत होतं.

तेथील निलकुरंज नावाचे एक फुल फार प्रसिद्ध आहे जे वर्षातून एकदाच उगवतो त्याचा रंग जांभळा आणि निळ्या रंगाचं हे फुल फार मोहक असे दिसते.

मुन्नारला निसर्गासोबतच खरेदीचा आनंदहि आपण घेऊ शकतो. कॉफी, चहा, वेलची, जायफळ, दालचिनी, सुका मेवा, चंदन साबण, वगैरे.. आणि मसाल्यांचे विविध पदार्थ आपण येथे खरेदी करू शकतो.

सोबत लहान मोठ्यांसाठी खास म्हणजेच येथील चॉकलेट फार चविष्ट आहेत. मुन्नार एक छोटं व सुस्त शहर आहे त्याच्या आसपास पट्रोल पंप, एटीएम व बँक सुद्धा आहेत तेथे एखादा चर्च सुद्धा आहे.

मुन्नारला दुकानांप्रमाणे आयुर्वेदिक मसाज सेंटर्सही मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि खिशाला परवडतील असे मसाज इथे करून मिळतात.

प्रवासाला कधी जाल – मुन्नार जून ते सप्टेंबर महिन्यात जाण्यास एक वेगळीच मजा आहे.

जवळचे स्टेशन – एर्नाकुलम (चार तास कार ने लागतात)

जवळचे एअरपोर्ट – कोची (तेथून साडे चार तास कार ने)

काय पाहाल– अनामुडी ट्रॅकिंग स्पॉट किंवा चहाचे म्युझिअम, चिन्नार वाईल्डलाईफ सेंच्युरी, सीतादेवी लेक किंवा लहानांसाठी पार्क वैगरे ….

  • राजेश दाभाडे, नवीन पनवेल

LEAVE A REPLY

*