Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : कुछ तो लोग कहेंगे…

Blog : कुछ तो लोग कहेंगे…

पाहता पाहता नवीन वर्ष कधी आलं समजलंच नाही, प्रत्येकासाठी येणारं वर्ष हे नवी आशा, नवी दिशा, नवी उमेद, नवा उत्साह, आणि बरंच काही घेऊन येईल म्हणून याला नवीन वर्ष अस म्हटले जाते आणि त्या प्रमाणे नवी संकल्प हि करतो. दरवर्षी आपण नवीन वर्ष साजरे करतो आणि सरत्या वर्ष्याला निरोप देतो, येणारं वर्ष हे एखाद्या पुस्तकां सारख असतं ३६५ दिवसाचं, जसं जसं नव पान पालटू तस तसं काहीतरी नवीन उमगतं, असो…

आपण ज्या देशात राहतो त्या देशात जशा राजकीय, सामाजिक, भोगौलिक, आर्थिक इ. पातलीवर बऱ्याच घटना अथवा घडामोडी घडत असतात तश्याच प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा काही आर्थिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज संबंधित गोष्टीं घडत असतात.

- Advertisement -

‘समाज’…कसा दिसतो हा समाज, काय म्हणतो हा समाज, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात इतकं महत्त्वाचं स्थान का आहे त्याचं, आपण या समाजाचं इतका विचार का करत असतो? , अर्थात, माणूस हा समाजशील आणि समाजाचाच एक भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधनाच्या कळत-नकळत मर्यादा असतात.

त्या मानायला हव्यातचं. पण, बहुतांश वेळा ‘लोक काय म्हणतील’ याचा बागुलबुवा करुन आपल्याला आवडणारा पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारा निर्णय आपण घेत नाही. त्यामुळे कुठलीही घटना अथवा एखादा पेचात पाडणारा प्रसंग एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडला की, त्या प्रसांगतून बाहेर कसं पडता येईल यापेक्षा लोक काय म्हणेल याचा विचार जास्त असतो, आणि हे साहजिकच असतं.

व्यक्तीला कुठल्याही गोष्टीला सामोरे जायचे असेल तर आधी समाजाचा विचार करावाच लागतो.. प्रसंगी काही व्यक्ती समजाच्या भीतीने घडलेल्या घटनेचा सामना करण्यास ही घाबरतो, आणि काही प्रसंगी खचतो सुद्धा..कारण या गोष्टीचा विचार जास्त असतो की “लोक काय म्हणतील’ त्यामुळे प्रयत्न सुद्धा करत नाहीत.

कारण या समाजाचा आपल्या विचारांवर, व्यक्तिमत्त्वावर, आयुष्यावर इतका खोलवर प्रभाव पडलेला असतो की साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा आपण लोकांचा विचार करतो. ज्या लोकांचा आपल्या खासगी आयुष्याशि काडीमात्र देखील संबंध नाही अश्या लोकांना आपण इतके महत्व द्यायला हवे का?

सामाजिक नीती-नियम पाळणे हा भाग वेगळा. पण, कुणी काय म्हणेल, या भीतीपोटी मन मारण्याला खरंच काही अर्थ आहे का? महत्वाचे म्हणजे, ज्या लोकांची भीती आपल्या मनात घर करुन बसली आहे, ते लोक आपला विचार तरी करतात का? लोक’ कोण असतात हे लोक ?
वास्तविक, लोक काहीच म्हणत नसतात किंवा माणसांना काही म्हणायच ही नसत.आपलेच मन कित्येक तर्कवितर्क काढत बसते आणि जे करायचं ते राहून जात.

आपण लोकांना देत असलेलं फाजील महत्त्व व लोकांकडे बघण्याचा आपला चष्माच आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. लोकांना तुमच्या प्रगतीपेक्षा अधोगतीशीच जास्त देणं-घेणं असतं. चुकीचे सल्ले कसे देता येतील, प्रोत्साहन न देता सतत टीका कशी करता येईल, तुमच्या प्रगतीत अडथळे कसे निर्माण करता येतील याबाबतीत लोकांचा उत्साह अफाट असतो. त्यामुळे ‘लोक काय म्हणतील’ या अत्यंत फालतू गोष्टीचा विचार मनातून काढून टाकायला हवा.

कुठल्याही व्यक्तीची सर्वात मोठी ताकद, शक्ती असते ते म्हणजे त्याचं “कुटुंब, परिवार, आप्तेष्ट,” ,अशी बरीच कुटुंब असतील ज्यांच्यासाठी आपली व्यक्ती जास्त महत्त्वाची असते. पण ज्यांच्या बाबतींत असं नाहीये त्यांचं काय? जेव्हा त्याची ही शक्तीच बाहेरील व्यक्तींचा अथवा समाजाचा विचार करते तेव्हा ती व्यक्ती मानसिक रित्या पूर्णपणे खचते, त्या व्यक्तीचा भक्कम आधार जेव्हा हा समाज हिरावून घेतो तेव्हा त्या व्यक्तीची परिस्तिथी काय होत असेल याचा या समाजाला काहीच देणंघेणं नसतं.

प्रत्येक कृतीचे वेळी ‘समाज काय म्हणेल?’ याचा किंवा लोकांच्या कोणत्याही बोलण्याचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्याला काय वाटते, आपल्या क्षमता किती आहेत, याचा विचार करुन आपण आपली वर्तवणूक ठरवली पाहिजे. अर्थात, याचा अर्थ लोक काही म्हणतच नाही.

आणि, लोकलज्जेला महत्वाचं द्यायचे नाही, असा मुळीच होत नाही. आपल्या प्रत्येक कृतीचे समाज निरीक्षण करत असतो. त्यावरूनच आपली सामाजिक प्रतिमा घडत असते. त्यामुळे सामाजिक बंधन, नीती नियम जोपासणे गरजेचेच. पण जर या समाजाला त्या व्यक्तीच्या मनाची, त्याच्या परिस्थितीची जाणीवच नसेल तर त्या समाज चा इतका विचार त्या व्यक्तीने का करावा…

जर ती व्यक्ती स्वतःच विचार करून आयुष्यात पुढे जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असेल तर या समाजाचं दुखड का गात राहावं त्याने, हा समाज काय आज चांगलं झालंय म्हणून तुम्हाला डोक्यावर बसवेल आणि काही चुकीचं घडलच तर फटकनिशी खाली खेचेल, म्हणतात ना “जितके लोक तितके तोंड’, त्यामुळे कुणाला किती आणि कुठपर्यंत महत्त्व द्यायचं हे त्याचं त्यांनी ठरवायचं असते, त्यामुळे याठिकाणी लोक का म्हणतील, याचा विचार सोडून आपण आपल्या मनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

आपले भले कशात आहे हे आपल्यालाचं कळायला हवे. आपले सामर्थ्य आणि आपल्या कमकुवत बाजू लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला त्याची जाण असायला हवी. सुयोग्य निर्णयक्षमता आपली आपल्याला विकसित करता आली पाहिजे. लोकांचे काय लोक तर दोन्ही ही बाजूनी बोलत असतात. म्हणून “ऐकावे जणांचे करावे मनाचे”.

कारण तुम्ही जे करणार आहात ते चुकीचं आहे की बरोबर हे तुमच्यापेक्षा इतर कुणीही ठरवू शकत नाही, आपण जे करतोय ते चुकीचं आहे की बरोबर हे इतरांनी ठरवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा, कदाचित जे ठरवलंय त्यात अपयशी सुद्धा होऊ शकतो पण त्या चुकीतून काहीतरी अनुभवच मिळेल आणि प्रयत्न केल्याचं समाधान ही असेल, आणि जर यशस्वी झालाच तर हा समाजाचं तुम्हाला डोक्यावर घेईल, विचार स्वच्छ आणि सकारात्मक असतील आणि आलेल्या परिस्तिथिला सामोरे जाण्याचे बळ तुमच्या अंगी असेल तर त्यातून नक्कीच काहीतरी चांगलाच घडतं, कधीतरी स्वार्थी होऊन स्वतःचा विचार करून काही पाऊल उचलीत तर त्यात काही चुकीचं नाही, फक्त इतकंच की तुम्ही जे करणार आहात त्यामुळे इतर कुणाचं नुकसान होत नाहीये ना इतकी काळजी मात्र नक्की घ्यावी, लोक बोलतीलाच त्यांना बोलू देऊयात, लोकांचा विचार जर करत बसलोत, तर जे करायचं आहे ते कधी करणार, लोकांना त्यांचं काम करू द्यात आपण आपलं काम करूयात… एक हिंदी म्हण आहे “हाथी चले बाजार, कुत्ते भुके हजार” बाकी काय…

कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है केहना…

तर सरत्या वर्ष्यात ज्या ज्या घडामोडी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडल्यात त्या सर्वांचा एकदा विचार करा, जे घडलय ते गेलंय, त्यातून काही तरी नवीन आणि चांगलं घेऊयात, सरत्या वर्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी- जी लोक सोबत होती आणि जी नव्हती त्या प्रतेकांचे आभार मानू यात, काहींसाठी क्षमस्व, तसेच हे नवीन वर्ष प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याच बळ देवो ही सदिच्छा.

  • शमिका खुशाल करिया, लेखिका ब्लॉगर आहेत!
- Advertisment -

ताज्या बातम्या