Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : लेखन क्षेत्रातील करिअरसंधी

Blog : लेखन क्षेत्रातील करिअरसंधी

लेखन किंवा लिखाण करणे हे कोणाचेही काम नाही. लेखनाची कला प्रत्येकातच असते असे नाही. आपले विचार, भावना कागदावर उतरवण्याची क्षमता आपल्या लिखानात असेल तर आपण एक उत्तम लेखक होऊ शकता. लेखनाची आवड असेल तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. सध्या लेखन क्षेत्र हा करियरचा चांगला पर्याय मानला जातो. सभोवतालच्या घटनांचे निरीक्षण करुन ते शब्दबद्ध करण्याचे कौशल्य अंगी असल्यास लेखन क्षेत्रात आपले करियर उज्ज्वल आहे, असे समजा.

लेखनकला ही कोणाकडूनही शिकली जात नाहीं किंवा शिकवली जात नाही. मात्र आपण या कलेत सुधारणा आणू शकतो. लेखनकौशल्य सर्वांनाच अवगत असेल असे नाही. हे एक प्रकारचे कौशल्य असून ते मेहनतीच्या जोरावर विकसित करु शकतो. अधिकाधिक वाचन करुन आपण लेखनात सुधारणा आणू शकतो. लेखन क्षेत्रात रोजगाराच्या बर्‍याच संधी आहेत. कॉपी रायटिंग, क्रिएटिव्ह रायटिंग, टेक्निकल रायटिंग, फीचर रायटिंग आदी क्षेत्रात लेखकांचे दरवाजे खुले आहेत. मोठमोठ्या कंपन्यांपासून एंटरटेनमेंट कंपन्यात लेखकाला चांगली मागणी आहे. मेहनत केल्यास उत्तम लेखक म्हणून ओळख प्रस्थापित होऊ शकते.

- Advertisement -

टेक्निकल रायटिंग – सध्याचा काळ हा टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा आहे. या ठिकाणी ज्ञान नेहमीच अपडेट होत राहते. तंत्रज्ञानाशी निगडीत कंपन्या आपल्या उत्पादनाविषयी ग्राहकांना सतत अपडेट करत राहते. हे अपडेट उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी टेक्निकल रायटरवर असते. एखाद्या उत्पादनाची विक्री वाढवणे हे काम टेक्निकल रायटरवर असते. तो सोप्या शब्दात तांत्रिक बाबींचा उलगडा करुन देत असतो. सध्याच्या काळात टेक्निकल रायटरची मागणी सॉफ्टवेअर कंपन्या, जॉब साइट, मल्टीनॅशनल कंपन्यांत वाढली आहे. टेक्निकल रायटरच्या रुपाने आज वर्तमानपत्र आणि मासिकातही लेखकांची संख्या कमीच राहिली आहे. या क्षेत्रात सुरवातीच्या काळात बारा ते पंधरा हजाराचे वेतन मिळते.

क्रिएटिव्ह रायटर – हा लेखक कल्पकतेचा वापर करतो. इमॅजिनेशनवर आधारित लेखन करण्याचे काम या लेखकाला करावे लागते. हे लेखन वैशिष्ट्यूपर्ण असते. हा आव्हानात्मक जॉब आहे. त्याच्या अंगी कविता लेखन, कथा लेखन, संवाद लेखन, जिंगल्स लिहणे, पटकथा लिहणे याचा समावेश होता. हा जॉब वेगळा असल्याने हे क्षेत्र आपल्याला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही गोष्टी मिळवून देते. जर आपली कहानी आणि गीत श्रोत्यांना आवडले तर आपल्याला बाजारात मागणी आहे, असे समजा. क्रिएटिव्ह रायटर म्हणून आपण करार करु शकतो आणि त्यानुसार चांगले उत्पन्न मिळवू शकतो. गुलजार, जावेद अख्तर, सलीम खान हे नामांकित क्रिएटिव्ह रायटर आणि कवी होत.

वेब कंटेट रायटर – आजकाल मोठ्या कंपन्यांनी आणि सेलिब्रिटींनी स्वत:चे संकेतस्थळ विकसित केले आहे. प्रिंटच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक मीडियमध्ये लेखन करणे अधिक आव्हानात्मक आहे. संकेतस्थळाला शब्दापासून आकर्षक करण्याचे काम वेब रायटर करत असतात. वेब रायटर हा साध्या, सोप्या आणि प्रभावी भाषेत लेखन करत असतो. संकेतस्थळाचे पंचलाइन आणि हेडलाइन लिहण्याचे कामही क्रिएटिव्ह रायटर करतात.

फीचर रायटिंग – प्रत्येक न्यूजपेपर आणि मीडिया हाऊसमध्ये फीचर डेस्क असतो. त्यावर काम करणारे फीचर रायटर असे म्हणतात. दररोजच्या बातम्याशिवाय वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रंजक माहिती देण्याचे काम ही मंडळी करत असतात. करंट अफेअरचा संदर्भ घेत तथ्याच्या आधारावर कथा लिहण्याचे काम फीचर रायटरला करावे लागते. फ्रीलान्सर म्हणूनही फीचर रायटिंगचे काम करता येते.

सायन्स रायटिंग – रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या कामात वेग आणण्यासाठी सायन्स रायटरला मागणी वाढली आहे. सायन्स गंभीर विषय असून त्यावर कोणीही लिखान करु शकत नाही. सायन्स विषयाची चांगली जाण असणारा विद्यार्थी सायन्स रायटिंग करु शकतो. या मंडळींना बाजारात खूपच मागणी आहे. कारण विज्ञानावर लिहणारे खूपच कमी आहेत. त्यामुळे आपण या करियरला पार्टटाइम जॉब म्हणूनही स्वीकारु शकतो.

रिज्युमे रायटिंग – नोकरीचा शोध घेणार्‍या युवकाकडे बायोडेटा, रिज्युमे असणे गरजेचे आहे. त्यास आकर्षक करण्याचे काम रिज्युमे रायटर करत असतात.

होस्ट रायटर – हे नाव आपण पहिल्यांदाच ऐकले असेल. सेलिब्रिटी हे आत्मचरित्र लिहण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांच्याकडे चांगले लेखक असतीलच याची खात्री देता येत नाही. ही मंडळी दैनंदिनीत चांगले लिखाण करतात, परंतु ते पुस्तकात आणू शकत नाहीत. अशावेळी होस्ट रायटर मदत करु शकतो. आपल्या विचारांवर आधारित असलेले पुस्तक बाजारात आणतात आणि त्यास आपण ऑटोबायोग्राफी म्हणतो. होस्ट रायटरला पुस्तक लिखाणाचे श्रेय मिळत नाही, मात्र पडद्यामागे त्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यांच्या कामानुसार पैसा निश्चित असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या