BLOG: अहमदनगर @ 527 : पर्यटनाचा समृद्ध पर्याय

0

अहमदनगर शहराचा रविवारी बर्थ डे म्हणजे वर्धापन दिन. तो सेलिब्रेट करण्यासाठी रसिक ग्रुपसह इतिहासप्रेमी संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे. या वाढदिवशी विकासाबाबत चर्चा होते. अस्सल नगरीपणाबद्दल भरभरून बोलले जाते. मात्र पुढे होत काहीच नाही. राजकीय नेत्यांना नावे ठेवली जातात. पण नगरविकास ही लोकचळवळ व्हायला हवी. याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. नगर टाईम्सने शहरातील राजकीय विश्‍लेषक, प्राध्यापक, व्यापारी, उद्योजकांची मते जाणून घेतली. त्यांनी सूचविलेले उपाय नगरकरांनी अंमलात आणले तर नक्कीच नगरचे रूपांतर खेड्यातून मेट्रो सीटीत होईल, त्याचाच हा परामर्श.

अहमदनगर शहराला धार्मिक, पौराणिक,ऐतिहासिक परंपरा आहे. राजकारण समाजकारण, सहकार, साहित्य, शैक्षणिक, कृषी आदी बाबतीत अहमदनगरचे राज्यात वर्चस्व आहे. येथील धार्मिक स्थळांसह पर्यटनाचे आकर्षण वाटते आहे. प्रयत्न केल्यास पर्यटनासारखा नवा उद्योग येथे उभा राहू शकतो. 
प्रा. नवनाथ वाव्हळ
9881827834

मध्ययुगात ज्या शहराची विकासाबाबत जगातील बगदाद, कैरो या सर्वोत्तम शहराची तुलना केली जात. आज मात्र एक मोठं खंउ ही ओळख. वैभवशाली ऐतिहासिक वारसा पर्यटनातुन जपला तर आर्थिक संपन्नता येईल. त्यासाठी निजामशाही, मोगल, मराठे, पेशवे, आणि ब्रिटीश राजवटीत निर्माण झालेलं गतवैभवाचे जोपसाव लांगेल.

अहमदनगर जिल्ह्याचे भौगोलिक वैशिष्ट्ये, गड कोट, जैववैविध्यता धार्मिक तिर्थक्षेत्र अभयारण्य, साहसी खेळासाठी आकाशी स्पर्धा करणार्‍या उंच डोंगर रांगा, समाधी स्थळे व स्मारके, जगातील तिसरे आणि आशिया खंडातील एकमेव रणगाडा संग्रहालय याकडं पर्यटनच्या दृष्टीने पाहिल्यास, निश्‍चतच पर्यटनवृध्दतून आर्थिक समृध्दी निर्माण करता येण्याची खात्री वाटते.
पर्यटन म्हणजे आनंदासाठी प्रवास, लोक उद्योग, विश्रांतीसाठी औषधोपचारासाठी दुरचा प्रवास करतात. ते अल्पकालीन स्थलांतर असतं. त्यांतूनच पर्यटन घडते. शेती पर्यटन यास अग्रो टुरीझम म्हटलं जात. कृषक्षी पर्यटन म्हणजे शेतावरील फेरफटका. आपल्या संस्कृतीची ओळख व आनंद.

या संकल्पनेत शहरी जीवनशैलीत उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे, आणि शेतकर्‍यांने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरतिथ्य करणं म्हणजे कृषी पर्यटन. मेहेराबादला विदेशी भक्त, पर्यटक येतात. नगरी खाद्यासंस्कृतिची ओळख अहमदनगरची होऊ शकेल. सांस्कृतिक पर्यटनाकडे आपल्या लोकप्रतिनिधींनी जास्त लक्ष्य दिले. तर आजच्या पेक्षा जास्त संधी सेवा उपलब्ध करता येतील.
अहमदनगरचा भूईकोट किल्ल्यासाटी गाईड प्रशिक्षित करता येतील. त्या त्या ठिकाणी वस्तू ज्या काळातील आहे. त्याकाळातील कपडे, रोजच्या वापरातील वस्तू, खाद्य पदार्थ जीवनशैली दर्शविणार्‍या गोष्टींचे संग्रहालय उभारता येऊ शकेल. त्यामूळे जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये अभ्यासगट निर्माण होतील. सार्वजिक सुविधा असाव्यात. येणार्‍या पर्यटांची होणारी लूट थांबविण्यासाठी स्थानिक खाद्या विक्रीची आणि पुजा साहित्याची विक्रीचे अधिकृत केंद्र निर्माण करता येईल.

काही ठिकाणी बस आणि रेल्वेस्थानकावरून पर्यटकांना बस व्यवस्था आहे. पर्यटनाचे मार्केटिंग, प्रशिक्षित मनुष्यबळ, पर्यटकांचे प्रबोधन या बाबीकडे लक्ष्य दिल्यास पर्यअन विकासामुळे हॉटेल, वाहतुक, तिकीट आरक्षण केंद्र जाहिरातील इ. विविध क्षेत्रात नगरकरांना रोजगारांच्या संधी, स्थानिक हस्तव्यवसाय कापड, धातू उद्योगाला चालना मिळेल. दूरदर्शी नेते, शासकीय अधिकारी व स्थानिक लोक यांच्या समन्वयातूनच आपण निश्‍चतच पर्यटनवृध्दीतून आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करू शकते.

(लेखक इतिहास संशोधक आहेत.)

 

LEAVE A REPLY

*