Type to search

ब्लॉग

हिंदी भाषा भारतीय एकतेचे प्रतीक

Share

इंग्रजांनी आपल्या भारत देशावर दोनशे वर्ष शासन केलं. सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी लढ़ा दिला आणि 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झालीत, परंतु जाता-जाता ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती इंग्रज सोडून गेले. या नीतीचा अवलंब आजच्या घडीला काही राजकीय नेते पुढे नेत आहे. ते या महान देशाची एकता, प्रांत, धर्म, जाती आणि भाषेला तुकड्यांमध्ये वाटून टाकले. भेदभाव आणि द्वेष चहूबाजूला पसरले. याचा परिणाम भारतीय भाषेंवर ही झाला. ज्यामुळे आज ही आपल्या भारत देशाची राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीला आपल्या आस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. केवळ राजभाषा म्हणून हिंदी भाषेला महत्व दिले जाते.

भारत देश इंग्रजांच्या तावडीतून तर सुटला परंतु इंग्रजी भाषा आज ही आपल्या इकडे ‘फोडा आणि राज्य करा’ अंतर्गत राज्य करीत आहे. देशाच्या इतर प्रांतात बोलल्या जाणार्‍या भाषेलाच आपण परकी भाषा म्हणत असतो. मात्र इंग्रजी भाषेचा निर्लज्जपणे स्वीकार करतो. आपल्या चिमुकल्या मुलांना इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत शिकवण्यात मोठं गर्व मानतो. ज्याला इंग्रजी येत नाही त्याला अशिक्षित व कमी लेखतो.

नुकतेच गुजरात हायकोर्टाने जुनागढ़, भावनगरच्या शेतकर्‍यांची याचिका स्वीकृत करून त्यांच्या मुलांना हिंदी माध्यमातून शिकवण्यास बंदी केली आणि म्हटले की, त्यांची मातृभाषा गुजराती आहे म्हणून त्यांना हिंदी शिकण्यात अडचण होते. म्हणून त्यांच्याकरिता हिंदीला परकी भाषा (फॉरेन लँग्वेज) समझली जावी असा निर्वाळा दिला. याबरोबर भारताच्या चार राज्यांनी देखील हिंदीला राष्ट्रभाषा मानण्यास नकार दिला.

जागतिकीकरण्याच्या या युगात इंग्रजी भाषेला महत्व द्यावे लागेल, हे मान्य परंतु याचा अर्थ असा नव्हे कि, आपल्या देशाच्या मातृभाषेलाच मागे टाकावे. ‘फोडा आणि राज्य करा’ इंग्रजांच्या या नीतीशी आजही हिंदी भाषा सामना करत आहे. इंग्रजी भाषेने आपले वर्चस्व असे बनवले आहे की हिंदी प्रत्येक ठिकाणी डावलली जाते. हिंदी भाषेच्या संदर्भात देश के क्षेत्र, प्रदेश आणि प्रांतानुसार हिंदी चे दोन चित्र दिसून येतात. एकीकडे हिंदी ला स्वीकारले जाते तर दुसरीकडे हिंदीला तिरस्कृत-अस्वीकृत केले जाते. इंग्रजांची जी रणनीति होती ती आजही कायम आहे. फरक इतकाच आहे कि, तेव्हा इंग्रज नेतृत्व करत होते आणि आज देशभक्तिचे मुखवटे चढवलेले बहुतांश सामाजिक आणि राजकीय नेतेमंडळी!

संवादाचं प्रभावी माध्यम भाषा होय. भारतात विविध प्रांत आणि प्रदेशानुसार स्थानीक भाषा बोलली जाते. ज्याला आपण बोली भाषा म्हणतो. प्रदेशानुसार प्रत्येक बारा कोसांवर भाषा, वेशभूषा, आचार-विचार, संस्कृति बदलत असते. जर महाराष्ट्राच्या खान्देश प्रातांबाबत सांगायचे झाले तर इथे अहिराणी, लेवागण या मूळ भाषेबरोबरच हिंदी भाषेचाही प्रयोग होताना दिसून येतो. या भागातील लोकं अडखळत का होईना परंतु हिंदी भाषेला आपल्या स्थानीक भाषेत मिसळून बोलण्याचा प्रयत्न करतात. भाषेच्या या मिश्रणातून एक नव्या भाषेचा उदय झाल्याचा अनुभव येतो.

भारत हा अनेक भाषेचा संगम आहे. या सगळ्या भाषांमध्ये हिंदीला देशाच्या राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला. स्वातंत्र्यानंतर 14 सप्टेंबर 1949 ला संविधान सभेत एक प्रस्ताव पारित करण्यात आला। त्यात हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून स्वीकृति दिली गेली. हिंदी भाषेला सम्मानार्थ प्रत्येक वर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. भारतीय चित्रपटांची संपूर्ण विश्वात लोकप्रियता आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये जवळपास एक लाख हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली आहे. या चित्रपटांकरिता हिंदी भाषेचा उपयोग केला जातो.

चित्रपटांचे डायलॉग आणि गाणे हिंदी भाषेत उत्कृष्टरित्या सादर केली जातात. संचार माध्यम म्हणून चित्रपट, समाजात आपली भूमिका बजावतात. समाजात घटित होणार्‍या चांगल्या-वाईट घटनांचे सविस्तर चित्रांकन चित्रपटांच्या माध्यमातून होते. यात हिंदी भाषा मुख्यपणे आपले योगदान देत असते. चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरात, टी.व्ही. शो, आकाशवाणी इत्यादि सर्व प्रसार माध्यमातही हिंदी अग्रस्थानी आहे. एफ.एम. रेडिओ आणि हिंदी वर्तमानपत्र तसेच हिंदी न्यूज चैनल्स, न्यूज वेबपोर्टलची संख्यादेखील दिवसागणिक वाढत आहे. दूसरीकडे हिंदी भाषेचा सोशल मीडियामध्ये वेगळे चित्र दिसते. वर्तमानस्थितित जरी ग्लोबल लैंग्वेज चलनात असली तरी सोशल मीडियामध्ये हिंदी भाषेचा बोलबाला आहे. आधी हिंदी भाषिक लोकांना सोशल मीडियामधअये काम करताना खूप अडचणी होत्या मात्र आज सोशल मीडियावर सक्रिय लोक हिंदी भाषेचा प्रयोग उघडपणे करू लागले आहे. एका रिपोर्ट नुसार प्रत्येकी पांच मधून एक व्यक्ति हिंदीत इंटरनेटचा उपयोग करते. हिंग्लिश देखील खूप चलनात आहे. इंग्रजी आणि हिंदीची काही वाक्ये सर्रास वापरली जातात. वॉटसअप, फेसबुक टिवटर किंवा ब्लॉगर्स वर सगळेच हिंदी भाषेचा प्रयोग अधिक प्रमाणात करताना दिसून येतात.

हिंदी देशाची राष्ट्रभाषा आहे. इथल्या मातीशी जुळलेली आहे. देशाची एकता राष्ट्रभाषेतून प्रतित होत असते. देशाची एकता बनवून राखण्याकरिता आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे कि आपल्या दैनिक कार्यात हिंदी चा उपयोग केला पाहिजे.
– आरिफ आसिफ शेख
मो. 9881057868

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!