नोटाबंदीच्या निषेधार्थ कोपरगावात काँग्रेसचा काळा दिवस

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर संपूर्ण देशभरात अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड विस्कळीतपणा आला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघू उद्योजक, असंघटित व्यापारी हतबल झाले होते. केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध करीत काळा दिवस पाळत असल्याचे निवेदन कोपरगाव तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार श्री. सुसरे यांना देण्यात आले.
कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, प्रदेश सदस्य राजेश परजणे, शहराध्यक्ष विकास आढाव, उपाध्यक्ष अजित कोरके, राजुभाई पठाण आदींसह पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. या प्रसंगी उत्तम माने, ज्ञानदेव गुडघे, बबन शिंदे, सोपान चांदर, अजय आव्हाड, अमित आढाव, दादा टुपके, बाळासाहेब दीक्षित, सचिन अजमेरे, शामकर्ण होन, शफिक सय्यद, खालिद कुरेशी, तनवीर शेख, सुकदेव जाधव, लक्ष्मण साबळे, सुभाष नरोडे, मच्छिंद्र लांबोळे, प्रसाद शिंदे, रामदास वैरागळ, जाकीर रंगरेज, बाबूराव पहिलवान, संजय वायखिंडे, रंगनाथ कानडे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याऐवजी विपरीत परिणाम झाले. शेतकरी, लघू उद्योजक, असंघटित, व्यापारी लयाला गेले आहेत. सर्वच शेतमालाचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. लहान रकमांचे व्यवहार अडचणीत आल.
रोजगार घटला, उत्पादनाचे प्रमाण मंदावले, बाजार थंडावला, दैनंदिन उपजिविका करणारे संकटात आले. प्रत्यक्ष बाजारपेठेत खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याचे नागरिकांचे स्वातंत्र्य मर्यादित झाले. या निर्णयाने नेमके काय फायदे तोटे झाले याचे वास्तव मूल्यमापन करायला केंद्र सरकार ाअजुनही तयार नाही. म्हणूनच काँग्रेस केंद्र सरकारचा निषेध करीत आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*