Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वनविभागाने दिले विहिरीत पडलेल्या काळविटाला ‘जीवदान’

Share
नाशिक | प्रतिनिधी
काळविट राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या ममदापूर येथे पाण्याच्या शोधात असलेले एक काळविट वाट चुकून विहिरीत पडले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्नाअंती काळविटास जीवदान दिले.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ममदापूर, राजापूर वनपरिक्षेत्र हे काळविटसाठी प्रसिद्ध आहे. जंगल परिसरातून दोन वर्षांचे काळविट पाण्याच्या शोधात वाट चुकून एका विहिरीत पडले. ही बाब विहीरमालक शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला.
त्यानंतर आज  (दि.११) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हे काळवीट गोल्हेवाडी येथील अशोक बारे यांच्या शेतातून उड्या घेत पळत असताना अचानकपणे अंदाज चुकल्याने विहिरीत कोसळले.
पाण्याचा आवाज आल्याने शेतमजूरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली असता विहिरीत पाण्यात काळवीट पोहत असल्याचे त्यांना आढळले. याबाबत तत्काळ त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी वनरक्षक प्रसाद पाटील, पंकज नागपुरे, गोपाळ हरगावकर, विलास देशमुख आदिंना घेऊन बारे यांचे शेत गाठले.
काळवीट पडल्याचे आढळल्यानंतर भंडारी यांनी वनरक्षकांच्या मदतीने तत्काळ बचावकार्य करून काळविट वाचवले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मदत झाली.
घरात वापरत असलेल्या खाटीच्या चारही बाजूंना दोरखंड बांधून विहिरीत सोडले. खाट विहिरीच्या पाणीपातळीपर्यंत पोहचली असता काळवीट विहिरीच्या आतील एका लहानशा कपारीजवळ येत खाटेवर अलगद येऊन बसले.
त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हळुवारपणे काळविटास वरती काढले. खाट जमिनीवर येताच काळविटाने वनक्षेत्राच्या परिसरात उड्या घेत काही क्षणात धावले. शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानाचे वनविभागाकडून कौतुक करण्यात आले.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!