भाजपाला सत्तेतून घालविण्याची ताकद कोणत्याही पक्षात नाही

0

नामदार गिरीश बापट : शिर्डीत भाजयुमोची प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात

शिर्डी (प्रतिनिधी) – देशातील कोणत्याही राजकीय पक्षात आता भाजपाला सत्तेतून घालविण्याची ताकद नाही. मात्र सत्तेचा वापर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी करा अन्यथा काँग्रेसला 50 वर्षे सहन केलेली जनता आपल्याला पाच वर्षांत पायउतार करेल, अशा कानपिचक्या अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक शिर्डी येथील हॉटेल पुष्पकमध्ये सुरू झाली. दोन दिवशीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ना. बापट बोलत होते. यावेळी भाजयुमोचे प्रदेश संघटक रवींद्र भुसारी, प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, आ. नरेंद्र पवार, आ. संतोष दानवे, आ. उन्मेष पाटील, आ. राजू तोडसा, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, संघटनमंत्री किशोर तारकड, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे आदींसह राज्यभरातून 450 कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. बापट म्हणाले, देेशाची वाटचाल विनाशाकडे होत असलेली पाहून जनतेने भाजपला सत्ता दिली. तिचा उपयोग जनतेची कामे करण्याकरिता व्हावा. कार्यकर्त्यांनी थेट जनतेत जाऊन त्यांचेे प्रश्‍न सोडवावेत. त्यासाठीच जनतेनेे सत्ता दिली आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत हे देशवासीयांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी झटून कामाला लागा. अन्यथा काँग्रेेस राष्ट्रवादीने जे केले तेच आपण करणार असू तर आपलीही अवस्था तीच होईल. तेव्हा दिलेली जबाबदारी चोख पार पाडा. माझ्याकरिता पक्ष नाही तर पक्षाकरिता मी आहे, या भावनेने काम करा.

अगामी 50 वर्षे भाजप सत्तेत राहील. पक्षाचे भवितव्य उज्ज्वल आहे. भविष्यातील इतिहासाचे साक्षीदार व्हा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. नरेंद्र पवार, हितेश चौधरी, आ. योगेश टिळेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कल्याणी रहाटकर यांनी केले.

कार्यकारिणी बैठक पार पाडण्यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष भगत, निरंजन डहाळे, अजय काशिद, सुशांत खैरे, श्रीराज डेरे, सागर कापसे, आकाश त्रिपाठी, रवींद्र गोंदकर, साईराज कोते, विनोद प्रेमाणी, लखन जव्हेरी, आबा झाकणे, सागर लोंढे, रोहित साबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

आजपासूनच कामाला
लागा : ना. भुसारी – 
प्रदेश संघटन मंत्री रविंद्र भुसारी म्हणाले पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर पक्षाची वाटचाल सुरु आहे. राज्यात व केंद्रात आपली सत्ता असली तरी अगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रत्येक बुथवर भाजपाला झेंडा फडकवून 288 मतदार संघात भाजप सत्तेवर येण्यासाठी आजपासूनच कामाला लागा. अगामी 50 वर्ष पंचायतीपासून केंद्रापर्यंत भाजपाचेच सरकार राहील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*