जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपाची फिल्डिंग

संख्याबळासाठी अन्य सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न

0
नाशिक | दि. २ प्रतिनिधी – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व शिवसेना नेते नरेंद्र दराडे यांनी शेतकरी कर्जमाफीचे कारण देत पावणेतीन वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यांनतर २०१५ च्या निवडणूकित शिवसेनेकडून हिरावला गेलेला अध्यक्षपदाचा घास पुन्हा पदरात पाडून घेण्याकरीता भाजपकडून जोरदार फिल्डिंग सुरू झाली आहे.

स्वतः पालकमंत्री यावर लक्ष ठेवून असून याकरीता गुप्त बैठका ंझडत आहेत. येनकेन प्रकारे जिल्हा बँक ताब्यात घेण्याकरीता राष्ट्रवादी, सेनेच्या पदाधिकारयांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांना विधानपरिषद उमेदवारीचे आमिष दिले जात असल्याचे समजते.

जिल्हा बँकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणूकित जिल्हा बँकेचा अध्यक्ष हिरे गटाचा की कोकाटें गटाचा यावरून बरेच राजकारण रंगले होते. मात्र पायरी चढता चढताही अध्यक्ष बदलाचा इतिहास असलेल्या या बँकेच्या निवडणूकित राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेच्या गटाने आ. अपूर्व हिरे आणि माणिकराव कोकाटे या भाजपच्या नेत्यांना जोरदार धक्का दिला.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या खेळीने अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास कांदे यांची बिनविरोध निवड झाली. हिरे आणि कोकाटे यांना विरोध असणार्‍या संचालकांनी ऐनवेळी मोट बांधल्याने बँकेत तिसराच गट अस्तित्वात आला त्यामूळे ताकद वाढली असतांनाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खेळीने भाजपला बँकेत सत्तेपासून दूर रहावे लागले.

जिल्हा बँकेत पक्षीय राजकारणात फारसे महत्व नाही. मागील निनवडणूकित खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असतांनाही भुजबळ फार्मवरून चक्रे फिरल्याने बँकेचे अध्यक्षपद येवल्याला मिळाले.

भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष
भाजपाची ताकद वाढली असतांनाही ऐनवेळी भुजबळ फार्म वरून सुत्रे हलल्याने भाजपला अध्यक्षपद गमवावे लागले. त्यानंतर चौकशीचा फेरा मागे लागलेल्या भुजबळांना तुरूंगात जावे लागले. मात्र आता ५ डिसेंबरला त्यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या बाजुने लागल्यास बँकच्या निवडणूकित पुन्हा चमत्कार घडू शकतो अशीही राजकिय गोटात चर्चा आहे. त्यामुळे भाजपाने जरी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी परवाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

*