भाजपातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

0

गट्टाणींचा आरोप : खासदार गांधीचे राष्ट्रवादी व काँग्रेससोबत तर आगरकरांचे सेनेशी साटेलोटे

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील भाजपमधील खा. दिलीप गांधी आणि शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर गटातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. एकमेकांवर कुरघोड्या करण्याच्या नादात खासदार दिलीप गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी नगर शहरात भाजपची पुरती वाट लावली आहे.

खासदार गांधी यांची राष्ट्रवादी व काँग्रेससोबत तर आगरकर यांची सेनेशी छुपी युती असल्याने भाजपची शहरात नाचक्की होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे व जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्याकडे शहर भाजपची धुरा द्यावी अशी मागणी माजी शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठविले आहे.

अहमदनगर महानगरपालिकेत गत आठवड्यात स्थायी व महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिकेतील जुन्या गट नेत्यांच्या शिफारशी ग्राह्य धरत महापौर सुरेखा कदम यांनी या नियुक्ती केल्या आहेत. परंतू गांधी-आगरकर यांच्यातील गटबाजीमुळे नियुक्त झालेल्या नगरसेवकावर राजीनाम देण्यासाठी दबाव आणला जात आहे.

मात्र, खासदार गांधी गटाकडे असलेल्या उपमहापौर पदाबाबत कोणी चकार शब्दही काढत नाहीत. ते पद अबाधित ठेवण्याचा डाव त्यामागे आहे. अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक पंधरा महिन्यावर येवून ठेपली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीचा इतिहास पाहता पक्षाकडून निवडून येणाार्‍या नगरसेवकांच्या संख्येचा आलेख घसरत चालला असल्याचे दिसते.
देशात व राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळत असतांना नगर शहर विधानसभासभेची जागा दुर्देवाने मिळू शकली नाही. 2013 च्या महानगरपालिकेच्या तिकीट वाटपचा गोंधळ सर्वांना माहीत आहे. त्यावेळेस पक्षाच्या तिकीटासाठी घोडेबाजार झाला होता.

खासदार गांधी आणि आगरकर यांच्यातील गटबाजीच संघर्ष सर्वश्रृत आहे. परंतू तिकीट वाटपाच्या वेळी दोघांचेही मनोमिलन होते. त्यातून जुने निष्ठावंत कार्यकर्ते तसेच पक्षात नव्याने आलेल्या चांगल्या कार्यकर्ते यांच्यावर तिकीट वाटपात अन्याय केला जाते. विधानसेभेची जागा राष्ट्रवादीच्या मनोमिलनामुळेच हातातून गेली. खासदार राष्ट्रीय पातळीवर लोकप्रतिनिधत्व करतात.

सरकारने घेतलेले चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा सहभाग हा शून्य आहे. खासदार गांधीचे सर्व कार्यक्रम हे पुत्र उत्कर्ष केंद्रीत आहे. खासदार हे केवळ आपल्या मुलांच्या वॉर्ड मध्ये खासदार निधाचा मोठा वापर केल्याचे दिसून येते. त्यामुळेच शहरातील नागरीकांमध्ये भाजपविषयी मोठी नाराजी पसरत आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांनी शहर भाजपचे पालकत्व स्वत:कडे घ्यावे. त्यांच्यात नेतृत्वाखाली 2018 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला पक्षाने समोरे जावे. जुन्या निष्ठांवन कार्यकर्त्यांना संघटीत करावे. महानगरपालिकेतील सत्ता गोंधळ त्वरीत थांबववा, असे गट्टाणी यांच्या पत्रात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*