Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

बहुमत सिद्ध करण्यात भाजप यशस्वी होईल – चंद्रकांत पाटील

Share

मुंबई | प्रतिनिधी 

उद्या विधीमंडळात भारतीय जनता पार्टी बहुमत चाचणी जिंकून सरकार स्थिर सरकार स्थापन करेल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या मुद्द्यावर ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करतो.

उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीत भाजपा बहुमत सिद्ध करेल. राज्याला स्थिर सरकारची गरज असून ते सरकार देण्यात भाजप यशस्वी होईल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भारतीय जनता पार्टी उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहे. उद्या सभागृहात बहुमत आम्ही सिद्ध करू असेही पाटील याप्रसंगी म्हणाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!