Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासंभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा

संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मराठा आरक्षण ( Maratha Reservation )आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी जाहीर केले असून त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजप ( BJP ) पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil )यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

जे ओबीसींना ते मराठा समाजाला असे सूत्र वापरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण, रोजगाराच्या अनेक सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. तथापि, महाविकास आघाडी सरकारमुळे (Mahavikas Aghadi Government ) आरक्षण गमावले तसेच मराठा समाजासाठी भाजप सरकारने चालू केलेल्या योजनांची अंमलबजावणीही होत नाही, असा आरोप पाटील यांनी केला.

फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरु केली, मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थींनींची निम्मी फी भरली आणि त्यासाठी ७८५ कोटी रुपये खर्च केले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी १० लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली. मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतीगृहे सुरू केली. आज हे सर्व बंद आहे. त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे किंवा राजे समरजितसिंह घाटगे अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांना मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागले, असे पाटील म्हणाले.

मराठा समाजासाठी भाजपच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजप असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण समर्थन देईल, असेही पाटील म्हणाले.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ( Former BJP MP Kirit Sommaya )यांचा सत्कार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पुण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही. पण ज्या पायरीवर सोमय्या यांना ढकलण्यात आले त्या पायरीवर त्यांचा सत्कार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर मात्र पोलीसांनी गुन्हा दाखल केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. भाजप यामुळे घाबरणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या