सरकारवरील विश्‍वासामुळे भाजपला यश : दानवे

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री सध्या परदेश दौर्‍यावर आहेत. ते परतल्यानंतर दिवाळी आहे. दिवाळी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. शहरी व ग्रामीण भागातील निवडणूक निकालात सर्वाधिक यश मिळवत भाजपच पहिल्या क्रमांकावर असल्याने यातून केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारवरील विश्वास व्यक्त झाला असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
नगरमध्ये पत्रकारांशी प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. ते म्हणाले, अण्णा हजारेंविषयी आम्हाला आदर आहे. त्यांच्या आंदोलनांना जनतेचा सकारात्मक प्रतिसाद नेहमी असतो. पण आता ज्या मुद्यांवर हजारे आंदोलन करणार आहेत. त्याचा मसुदा आल्यानंतर सरकार विचार करेल.
सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन निवडणुकांतून होत असते. 13 महापालिका, 10 जिल्हा परिषदा, 72 नगरपालिकांच्या यशानंतर आता राज्यात 1 हजार 700 सरपंच भाजपचे झाले आहेत. शहरी व ग्रामीण भागात पक्षाचे वर्चस्व निर्माण झाल्याने यातून जनतेचा सरकारवरील विश्वासच व्यक्त होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  पाच वर्षे सरकारला धोका नाही, असे सांगून दानवे म्हणाले, सेनेची आंदोलनांची भूमिका ही पक्ष म्हणून आहे. तो राजकीय पक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणेंचा मंत्रिमंडळातील समावेशाबाबत, मुहूर्त शोधावा लागेल व तो योग्यवेळी होईल, असे त्रोटक भाष्य त्यांनी केले.

LEAVE A REPLY

*