भाजपकडून पाणी आरक्षण कमी करण्याचा डाव – अजय बोरस्ते

0

नाशिक । गंगापूर आणि दारणा धरणात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला असुन नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात उच्चांकी पाणी गेले आहे. असे असतांना गंगापूर धरणातून शहरात सद्यस्थित केवळ एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे.

हा पुरवठा देखील अनियमित व कमी दाबाने होत असल्याने असल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे आता शहरात सर्वच विभागात दोन वेळा पाणी पुरवठा करावा अशी मागणी महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. धरणात मुबलक जलसाठा असुनही सत्ताधारी भाजपाकडुन एकवेळ पाणी पुरवठा करुन शहराचे पाण्याचे आरक्षण कमी करण्याचा आणि नंतर जायकवाडीला पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला.

महापालिकेतील विरोधीपक्ष कार्यालयात आज बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील काही भागात सुरु असलेला अनियमित व कमी दाबाने होणारा पाणी पुरवठ्याकडेे लक्ष वेधले. नागरिकांच्या पाण्यासंदर्भात तक्रारी वाढल्या आहे. याची दखल सत्ताधार्‍यांनी घ्यावी, असे स्पष्ट करीत बोरस्ते म्हणाले, यंदा पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणात कमी दिवसात मोठा जलसाठी झाला आहे. असे असतांनाही शहरात मागील वर्षापासुन एकवेळ पाणी पुरवठा केला जात आहे. याच प्रकारामुळे काही भागात कमी वेळ आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पुरेशे पाणी मिळत नसल्याच्या तक्रार आहे. तेव्हा सर्वच नागरिकांना पुरेशे पाणी मिळण्यासाठी पूर्वीप्रमाणे दोन वेळचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. अशा स्थितीत सत्ताधार्‍यांनी दोन वेळा पाणीपुरवठा केला नाही तर यासंदर्भात महासभेत जाब विचारला जाईल असा इशारा त्यांनी दिला.

सद्या गंगापूर धरणात मध्ये 84 अणि दारणात 86 टक्के पाणीसाठा झाला असुन देखील नाशिककरांवर कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याचे चित्र असल्याचे सांगत बोरस्ते म्हणाला, हे पाणी संकट दूर करायला हवेत. शहरात नाशिकरोड, सातपूर व सिडको या भागात नागरिकांनी पुरेशे पाणक्ष मिळत नसुन याठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी यांच्याकडुन एकवेळ पाणीपुरवठा करून नाशिक शहराचे पाण्याचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे नाशिकचे आरक्षण कमी करुन उर्वरीत पाणी हे मराठवाड्याला पळवण्याचा पुन्हा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

*