Type to search

Featured maharashtra

पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपा राज्यात प्रथम क्रमांकावर

Share
भाजपच्या तीन जिल्हाध्यक्षांची शुक्रवारी निवड, Latest News Bjp Distric President Selected Friday Ahmednagar

मुंबई:

राज्यात पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष 52 पंचायत समित्यांमध्ये यश मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून अन्य पक्ष याबाबतीत भाजपापेक्षा खूप मागे राहिले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

राज्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकांच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये भाजपा 52 पंचायत समित्यांमध्ये यश मिळवून पहिल्या स्थानावर आहे. याखेरीज सात पंचायत पंचायत समित्यांमध्ये भाजपाला इतरांसोबत आघाडी करून यश मिळाले आहे. भाजपाशी स्पर्धा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (34 पंचायत समित्या), शिवसेना (31 पंचायत समित्या) आणि काँग्रेस (23 पंचायत समित्या) हे पक्ष मागे पडले आहेत. ग्रामीण भागात भाजपाचा भक्कम असल्याचे या निकालातून दिसून आले आहे…

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!