Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रखडसे, काकडे यांचा पत्ता कट; भाजपच्या दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना राज्यसभेची...

खडसे, काकडे यांचा पत्ता कट; भाजपच्या दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : या महिन्याच्या अखेरीला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत.  या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचीही घोषणा करण्यात आली. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

आता, भाजपने तिसरे नाव जाहीर केल्याने एकनाथ खडसे आणि सहयोगी खासदार संजय काकडेंच्या नावाला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपाकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत भागवत कराड?

  • शिक्षण – एमबीबीएस, एमएस
  • संचालक – भगवान शिक्षण प्रसारक मंडळ
  • वायएसके हॉस्पिटल
  • धन्वंतरी एज्युकेशन

राजकीय प्रवास

  • भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक
  • 1995 – 2010 दरम्यान 3 वेळा औरंगाबाद महानगर पालिकेत नगरसेवक
  • 1997 ते 1998 दरम्यान औरंगाबादचे उपमहापौर
  • एप्रिल 2000 ते ऑक्टोबर 2001 आणि नोव्हेंबर 2006 ते ऑक्टोबर 2007 दरम्यान औरंगाबादचे महापौर
  • 1999 ते 2009 दरम्यान औरंगाबाद मनपात सभागृह नेते
  • 2009 औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार, मात्र पराभव

भाजपमधील सध्याचे स्थान

  • महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष
  • मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष
  • रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे स्वतंत्र संचालक
- Advertisment -

ताज्या बातम्या