भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर; मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

0
मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आजपासून तीन दिवस मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांचे मुंबईत आगमन झाले.

मुंबई विमानतळावर अमित शाह यांचे मुंबई भाजपकडून जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,  मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे शाह यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

या दौऱ्यामध्ये अमित शाह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते आहे.

LEAVE A REPLY

*