Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम जाहीर

Share

बुथ समित्यांनंतर तालुका अन् जिल्हाध्यक्षांची होणार निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचा संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 10 नोव्हेंबरपासून सक्रीय सदस्य नोंदणीस सुरूवात झाली असून 15 डिसेंबरपूर्वी प्रदेशस्तरावर राष्ट्रीय परिषदेसाठी सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम बुथ समितीच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. यानंतर तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली.

भाजपने संघटनात्मक बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. प्रदेश सरचिटणीस सुरेश हळवणकर यांची राज्याचे निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यासाठी खा. गिरीश बापट यांची नियुक्ती झाली असून त्यांनी जिल्हा दौर्‍यावर येऊन नुकतीच बैठक घेतली आहे.

किमान 25 प्राथमिक सदस्य केलेल्या व्यक्तीची निवड सक्रीय सदस्य म्हणून केली जाणार आहे. यातून बुथ समितीच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. हे बुथ समितीचे अध्यक्ष मंडळ अध्यक्ष (तालुका अध्यक्ष) यांची निवड करणार आहे. नंतर जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अशी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान प्रथम सक्रिय सदस्य नोंदणी केली जाणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत सक्रिय सदस्यांची पडताळणी केली जाणार आहे. 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यान बूथ समिती सदस्य व अध्यक्ष निवडले जाणार आहेत. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर याकाळात जिल्हा समिती सदस्य व जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर 15 डिसेंबरपूर्वी प्रदेशस्तरावर राष्ट्रीय परिषदेसाठी सदस्य व प्रदेश अध्यक्षांची निवड पार पडणार आहे.

पक्षाच्या मंडल निवडणूक अधिकारी सहअधिकार्‍यांमध्ये अकोले प्रकाश चित्ते आणि सीताराम भांगरे, संगमनेर शहरात शिवाजी गोंदकर आणि राजेंद्र सांगळे, संगमनेर ग्रामीणमध्ये जालींदर वाकचौरे आणि काशिनाथ पावसे, कोपरगाव शहरमध्ये भरत फटांगरे आणि कैलास खैरे, राहाता रवि बोरावके आणि नंदकुमार जेजूरकर, श्रीरामपूर शहर नितिन कापसे आणि किरण लुणिया, श्रीरामपूर ग्रामीण अरुण मुंडे आणि सुनील वाणी, नेवासा बाळासाहेब पोटघन आणि ज्ञानेश्वर पेचे, राहुरी सचिन तांबे आणि विक्रम तांबे, शेवगाव अ‍ॅड. युवराज पोटे आणि बापूसाहेब पाटेकर, पाथर्डी प्रसाद ढोकरीकर आणि माणिक खेडकर, जामखेड मृत्यूंजय गर्जे आणि रवी सुरोसे, कर्जत सत्यजित कदम आणि अशोक खेडकर, श्रीगोंदा अशोक अहुजा आणि बाळासाहेब महाडीक, पारनेर अ‍ॅड. विवेक नाईक आणि विश्वनाथ कोरड आणि नगर तालुका संतोष लगड आणि दिलीप भालसिंग यांचा समावेश आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!