तीन वर्षात केंद्र सरकारने विश्वास संपादन केला : खा. सहस्त्रबुध्दे

0

अकोले (प्रतिनिधी) – तीन वर्षात केंद्र सरकारने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. पारदर्शी व भ्रष्टाचार मुक्त सरकार अशी प्रतिमा सरकारने निर्माण केली आहे. जगात देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याची 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत असतांना भारताचे नाव जगात वरच्या स्थानी असेल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला. या दरम्यान 27 ऑगस्ट ला एका मात्तबर काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे याबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला नो कॉमेंट्स अशी प्रतिक्रिया देऊन मुळ प्रश्नाला बगल दिली.

खासदार सहस्रबुद्धे हे काल बुधवारी अकोले तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी राजुर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष वकील एम एन देशमुख,सचिव माजी प्राचार्य टी एन कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या बजेटला 30 टक्के कपात लावलेली आहे याकडे लक्ष्य वेधले असता खासदार सहस्रबुद्धे म्हणाले की, केंद्राच्या बजेट ला प्रशासकीय अडचणी येतात याकडे लक्ष्य वेधले. इतिहासाच्या पुनरलेखनाचा आक्षेप त्यांनी फेटाळला. विरोधक पुनलेखनाचा आरोप करुण आमचा अपप्रचार करत आहेत त्यात तथ्य नाही. पारंपरिक पदवी किंवा पद्ववूत्तर शिक्षण घेण्या पेक्षा कौशल्यधिस्थित शिक्षण रोजगार प्राप्तिला पूरक राहिल. पदवीच्या आकर्षनापेक्षा व्यावसायिक कौशल्याचा जीवनामध्ये अर्थार्जनाला फायदा होईल असे खासदार सहस्रबुद्ध्ये यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.

गेल्या तीन वर्षात सरकारने जनतेच्या मनातील विश्वास संपादन केला आहे, नात्यागोत्याचे धोरण दूर अंतरावर ठेवले आहे. हे सरकार काम करणारे आहे, भ्रष्टाचारा ला मुठ माती देणारे हे सरकार जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजले आहे. परराष्ट्र खाते, सार्वजनिक बांधकाम खाते व अन्य मंत्रलयाचे मंत्री काम करणारे असून पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नतील संकल्पनेला सिद्धि प्राप्त झाल्याने देशाबाहेरही आपली प्रतिमा उज्ज्वल बनली आहे. 2022 मध्ये देशाच्या 75 वी च्या वेळेस भारत देश हा अधिक विकसीत व ठळक देश बनेल असा विश्वास खासदार सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*