Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याबारामती अ‍ॅग्रोबाबत मोहित कंबोजांचे ट्विट अन् त्यावर रोहित पवारांचे प्रत्यूत्तर...

बारामती अ‍ॅग्रोबाबत मोहित कंबोजांचे ट्विट अन् त्यावर रोहित पवारांचे प्रत्यूत्तर…

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (monsoon session) सुरुवात होत असताना भाजप (bjp) नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी राष्ट्रवादीवर (ncp) निशाणा साधला होता.

- Advertisement -

त्यानंतर विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मोहित कंभोज यांनी थेट आमदार रोहित पवार (rohit pawar) यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बारामती अ‍ॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे.

बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या मी अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे, असा इशाराच कंबोज यांनी रोहित पवार यांना दिला आहे. आधी सिंचन घोटाळा तर आता रोहित पवार यांच्या ॲग्रो आणि सहकारी कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

रोहित पवारांचा पलटवार

मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर रोहित पवार यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, त्यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील ५२०कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या