मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू- आ. राम कदम

0
मुंबई : ‘कोणतंही काम असेल तर मला भेटा. अगदी एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तरी माझ्याकडं या. मी १०० टक्के मदत करेन. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन. हे उद्गार आहेत देशभरात ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहीम राबवणाऱ्या भाजपचे मुंबईतील आमदार व प्रवक्ते राम कदम यांचे. घाटकोपर या त्यांच्या मतदारसंघात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी ही वक्तव्य केली आहेत.

भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. ‘एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,’ असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

*