Video : अखेर आमदार राम कदमांनी मागितली माफी

0
मुंबई दि. ६ प्रतिनिधी | आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या आमदार राम कदम यांनी अखेर झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. ट्विटरद्वारे त्यांना ही माफी मागितली आहे.

दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार कदम यांच्या विरोधात राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनामुळे कदम यांच्यासह भाजपाही अडचणीत सापडल्यानंतर कालपर्यंत दिलगिरी व्यक्त करणा-या कदम यांनी ट्विट करून माफी मागितली आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता भगिनींची मने दुखावली.झाल्या प्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली.

माता भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे. असे ट्विट आमदार राम कदम यांनी केले असले तरी त्यांनी जाहीर माफी मागावी अशी काही महिला संघटनांनी मागणी केल्याचे समजते.

दरम्यान, भाजपकडून दहीहंडी उत्सवादरम्यानचा व्हिडीओ मागविण्यात आला असून आमदार कदमांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*