Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

‘हनुमान कुस्ती खेळायचे, ते एक खेळाडू होते’-भाजपा मंत्री चेतन चौहान

Share

लखनौ : रामभक्त हनुमान यांच्या जाती व धर्मावरून भाजपने सुरू केलेल्या वादात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका मंत्र्याने उडी घेतली आहे. हनुमान खेळाडू होते व कुस्ती लढायचे. असे विधान उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री चेतन चौहान यांनी केले आहे.

अमरोहा येथे आयोजित एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, जितके पहेलवान आहेत ते देखील हनुमानाची पूजा करतात. माझी देखील त्यांच्यावर श्रद्धा आहे. मी त्यांना मानतो. ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. देवाची कुठलीही जात नसते. मी त्यांना जातीच्या वादात पाडत नाहीये असेही चौहान यांनी म्हटले आहे. चौहान माजी क्रिकेटरपण आहेत.

दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असा दावा केला होता. तर, भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे म्हटले आहे. तसेच योगी कॅबिनेटमधील आणखी एक मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा दावा केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!