Type to search

maharashtra जळगाव फिचर्स राजकीय

भाजपाचे 4 सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात !

Share

जळगाव  – 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसंदर्भात हालचाली गतीमान झाल्या असून शनिवारी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह जि.प.सदस्यांची बैठक माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

या बैठकीला भाजपचे चार सदस्य अनुउपस्थित राहिले असून ते चार सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीने जि.प. अध्यक्ष आमचाच होईल, असा दावा केला आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला नाट्यमय वळण मिळू नये, म्हणून भाजपचे सदस्य रविवारी सहलीवर रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.

जिल्हा  परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी 3 जानेवारी रोजी  निवड होणार आहे.त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस- काँगे्रस या महाविकास आघाडीच्या सदस्यांसह प्रमुख पदाधिकार्‍यांची पद्मालय विश्रामगृहात बैठक झाली.

त्यांनी चमत्कार घडवून महाविकास आघडीचा जि.प. अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. त्यानंतर भाजपच्या सदस्यांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन रावेर लोकसभा मतदार संघाकडे जि.प. अध्यक्ष तर  जळगाव लोकसभा मतदार संघाकडे उपाध्यक्ष पद देण्याविषयी चर्चा झाली.

महाविकास आघाडीचे बहुमत नसतानाही जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे  जिल्हा परिषदेचे राजकारण थंडीतही जोरदार तापू लागले आहे. सदस्यांची फोडाफोडी होण्याची शक्यता लक्षात घेता खबरदारी म्हणून

भाजपचे 20 ते 22 सदस्य रविवारी सायंकाळी सहीवर रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान,काही सदस्यांना संपर्क साधला असता  3 जानेवारीपर्यंत सर्व सदस्य जि.प. अध्यक्ष यांच्या बंगल्यावरुन  रविवारी जिल्ह्याच्या बाहेर सहलीवर रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाच दिवस सदस्य सहलीवर

जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे राजकारण तापू लागले आहे. भाजपचे सदस्य पाच दिवसांच्या सहलीवर रवाना झाले असून 3 जानेवारी रोजी सकाळी जळगावात दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!