Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

आमच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज : नितीन गडकरी

Share

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात बोलत होते. भाजपाच्या नेत्यांनी मीडियाला सामोरं जाताना कमी बोललं पाहिजे.

राफेल प्रकरणावर भाजपाकडून घेण्यात आलेल्या 70 पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी कोणत्याही कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलत नाही. राफेलच्या प्रकरणात काँग्रेसच्या संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)च्या मागणीवरही त्यांनी भाष्य केलं. जेपीसी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं त्यांना उत्तर देणं गरजेचं नसल्याचंही मत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

भाजप -शिवसेना युतीम्हणजे ‘तुझ माझ जमेना’….

भाजपावर सतत टीका करणाऱ्या मित्रपक्ष शिवसनेवर विचारलेल्या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये वाजपेयी असताना जसे संबंध होते तसेच आताही आहेत. ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ या म्हणीप्रमाणे शिवसेना-भाजपाचे झालं आहे. महाराष्ट्र, मराठी लोकांच्या आणि देशासाठी आमची युती लाभदायक आहे, असे गडकरी म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे असेही गडकरी म्हणाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!