Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय

Share

भोपाळ : मध्यप्रदेशात सध्या निवडणुकीच्या वातावरणात आरोपप्रत्यारोपांच्या राजकारणाने जोर घेतला आहे. अशातच एका बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक केस असो की पाच, पण आपल्याला जिंकणाराच उमेदवार पाहिजे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते कमलनाथ आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ रिट्वीट करत शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक पोस्ट देखील लिहली आहे. ‘काँग्रेसचं हे राजकारण असेल तर… नागरिक समझदार आहेत, 28 नोव्हेंबर रोजी मतदान करून कोणाला विजयी करायचे याचा निर्णय तेच घेतील’.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!