Type to search

Breaking News Featured जळगाव मुख्य बातम्या

…तर भाजपच्या आणखी २५ जागा वाढल्या असत्या; तिकीट नाकारण्याचे कारण काय? : खडसे

Share

मुंबई | प्रतिनिधी

२०१४ साली भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ खडसे यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यामुळे नाराजी आहे. एकूण राजकीय परिस्थिती बघता त्यांनी नाक कापून अवलक्षण करू नका, असा सल्ला भाजपला दिला होता.

तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अजित पवार यांनी दिल्यानंतर राजकारणात दलाल निर्माण झाले असल्याचेही ते म्हणाले होते.जर तिकिटे नाकारली नसती तर आणखी २५ जागा भाजपच्या वाढल्या असत्या असे म्हणत भाजप विरोधी बाकावर बसणार असल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली.

ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले, 2014 च्या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यावर सिंचन गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर अजित पवार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री पदाची फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर खडसे यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि सध्याच्या सत्ताकारणाचे भाजपमधील सूत्रधार यांच्यावर टीकेच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली होती.

आजच्या संपूर्ण घडामोडीनंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,   जर भाजप सर्वांना सोबत घेऊन लढले असते तर आणखी किमान २५ जागा वाढल्या असत्या; जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय? सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले गेल्याचेही ते म्हणाले.

खडसेंना आयते कोलीतच आता पक्षातील नेत्यांवर टीका करण्यासाठी मिळाले आहे. ते म्हणाले,  राज्यात सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतरदेखील भाजपला मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही. विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढवल्यामुळे खंत वाटत असल्याचेही खडसे म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!