Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप नेते आशिष शेलार यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | Mumbai

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

- Advertisement -

आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी (threat call) देण्यात येते आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आशिष शेलार यांनी काल मुंबईचे पोलीस (Mumbai Police) आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagarale) यांना पत्र लिहुन तक्रार केली आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रातून सांगितलं आहे.

आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले पाहिजे असे म्हटले आहे. आशिष शेलार सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात. सरकारचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणत आहेत. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी गंभीरपणे घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या