Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ९ ऑगस्टला त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जेटली यांच्यावर २०१८ मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीलाच त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने त्यांनी १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी टाकण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. २०१४ च्या मोदी सरकारमध्ये त्यांनी अर्थ आणि संरक्षण ही महत्वाची दोन खाती त्यांनी सांभाळली होती.

जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती.

जेटली यांचा जीवनप्रवास

१९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली. १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली. सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. भारताच्या सोळाव्या लोकसभेत अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!