Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

भाजप पदाधिकाऱ्याची दुकानात खुलेआम शस्त्रविक्री

Share
कल्याण : फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला कल्याण क्राइम ब्रँचच्या युनिटने अटक केली आहे. या युनिटने डोंबिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका दुकानावर अचानक धाड टाकून दुकानदाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दुकानातून तब्बल १७० प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.

डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस हे दुकान आहे. हे दुकान भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या मालकीचे आहे. धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. त्याच्या दुकानात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानुसार पोलिसांनी छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा सुमारे 2 लाख रुपयांचा आहे. यात पिस्तूलचाही समावेश आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणामुळे भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!