Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलीकॉप्टरचे नाशिकमध्ये इमर्जन्सी लॅडिंग

Share

नाशिक | प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोले येथील सभेला संबोधित करण्यासाठी निघाले असतानाच त्यांच्या हेलीकॉप्टरचे ओझर विमानतळावर इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे  हेलीकॉप्टरचे इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. सायंकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. भाजपचं अनेक केंद्रीय मंत्र्यांचा जत्था महाराष्ट्रात दाखल झाला असून प्रचारसभांची जणू स्पर्धाच गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात बघायला मिळाली आहे.

अमित शाह यांची आज अकोल्यात दुपारी सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ते अकोल्याकडे निघाले होते. मध्यरात्रीपासून बदललेल्या हवामानाचा फटका अमित शाह यांनाही बसला. अचानक वैमानिकांच्या आणि सुरक्षा यंत्रणेच्या सल्ल्याने त्यांच्या हेलीकॉप्टरचे इमर्जन्सी लॅडिंग नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळावर करण्यात आले.

शाह यांच्या हेलीकॉप्टरचे इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आल्यामुळे सर्वत्र चर्चा सोशल मीडियात रंगत होत्या. दरम्यान, पाऊस ओसरल्यानंतर शहा यांच्या हेलीकॉप्टरने अकोल्याच्या दिशेने उड्डाण केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!