Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : कॉंग्रेस आमदार हिरामण खोसकरांना भाजपकडून ५० कोटींची ऑफर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राज्यातील सत्तानाट्य संपण्याचे नाव घेत नाहीये. भाजपकडून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी कोट्यावधी रुपयांची ऑफर देऊ केली जात आहे. शिवसेना आमदाराला ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्यानंतर आज इगतपुरीचे कॉंग्रेस आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे काही मध्यस्थी आपल्या घरी आले होते. परंतु, बाहेर असल्याचे सांगत त्यांना परतावून लावले तसेच आपण कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचे खोसकर म्हणाले.

खोसकर कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टीकरण कॉंग्रेस महिला आघाडीच्या डॉ. हेमलता पाटील यांनी स्पष्ट केले.   राज्यात सत्ता स्थापनेसाठी सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेल्या भाजपकडून शिवसेनेच्या व्यतिरिक्त संख्याबळ जमवून सत्ता स्थापनेचा मार्ग अवलंबिला जाताना दिसून येत आहे.

आज राज्य विधानसभेचा कार्यकाल संपृष्टात येत आहेत. मुख्यमंत्र्यांना आज कायद्यानुसार राजीनामा द्यावा लागेल. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मिडीयाच्या समोर न आलेल्या मुख्यमंत्र्यांची काय खेळी आहे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

भाजपकडून आज सेना आमदाराला पन्नास कोटींची ऑफर देण्यात आल्याची बातमी झळकली होती. तर कॉंग्रेसच्या आमदारांना फोडण्याचेही काम भाजपकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

इगतपुरी येथील कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना भाजपने संपर्क साधून पन्नास कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याची चर्चा सध्या नाशिकच्या पंचक्रोशीत सुरु झाली आहे. विशेष म्हणजे खोसकर यांना भाजपने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोपच विजय वडेट्टीवार यांनी केल्यामुळे भाजपकडून सत्तेचा घोदेबार्जार होत असल्याची टीका पुन्हा एकदा वडेट्टीवार यांनी केली आहे.

नाशिकच्या कॉंग्रेस महिला आघाडीच्या हेमलता पाटील यांनी सांगितले की, खोसकर कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. एकनिष्ठ आहेत ते कुठेही जाणार नाहीत.त असे सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला.

दरम्यान, खोसकर यांनी सांगितले की, काही मध्यस्थी आपल्या घरी आले होते. परंतु, बाहेर असल्याचे सांगत त्यांना परतावून लावले तसेच आपण कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचे खोसकर म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!