Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

आचारसहिंतेचे उल्लंघन; मराठी मालिकांमधूनही भाजपचा प्रचार

Share
मुंबई – निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षातर्फे हिंदी वाहिनीवरील मालिकांच्या माध्यमातून आचारसहिंतेचे उल्लंघन केल्याचा प्रकार पुढे आला होता. भाजपकडून टीव्हीवरील मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता केला जात आहे. हा प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे.

“तुला पाहते रे” या मराठी मालिकेतून भाजपच्या याजनांचा प्रचार केला जाता आहे. हिंदी मालिकांनंतर भाजपने आता मराठी लोकप्रिय मालिकांकडे मोर्चा वळवला आहे. मराठी लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ मालिकेतून ‘मेक इन इंडिया’ योजनेचा प्रचार ८ एप्रिलच्या प्राइम शोमधून करण्यात आला आहे. या विरोधात आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजपतर्फे प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील ‘तुझसे हे राबता’ व अॅन्ड टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमधून यापूर्वी प्रचार झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!