त्र्यंबकेश्वरला निवडणूकीच्या तोंडावर भाजपा नगरसेवक शिवसेनेत

0

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) ता. १६ :नगराध्यक्षपदासाठी इच्छूकांची संख्या आणि पक्ष प्रवेशाचा पायंडा कायम असून आज भाजपा नगरसेवक धनंजय तुंगार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ते लवकरच होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट पद्धतीने निवड होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सेनेकडून आग्रही असल्याचे समजते.

श्री. तुंगार हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक असून यापूर्वी इंदिरा काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. तसेच ते अपक्ष असतानाही एकदा निवडून आले होते.

अलिकडेच भाजपा नगरसेविकापती आणि भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या एका नेत्याने नगराध्यक्षपदाच्या अपेक्षेने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तो शहरात चर्चेचा विषय झाला होता.

आता निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा पक्षप्रवेशांना जोर आला असून त्र्यंबककर कुणाला पसंती देतात हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

त्र्यंबकेश्वराच्या विश्वस्त आणि पुजाऱ्यांना लागले नगराध्यक्षपदाचे वेध

LEAVE A REPLY

*