बीट क्वॉईनचे व्हिएतनाम कनेक्शन

संशयितांची कारागृहात रवानगी

0
नाशिक | दि. २६ प्रतिनिधी – बीट क्वॉईन या इंटरनेटवरील व्हॅर्च्युअल करन्सीचे व्हिएतनाम कनेक्शन समोर आले आहे. व्हिएतनाम आणि मलेशिया शेजारी राष्ट्र असून या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढली आहे. दरम्यान, गुरुवारी सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

निशेद महादेव वासनिक (२९, रा. वसीम प्राईड सोसायटी, आराधनानगर, दिघोरी-खाबीरोड, नागपूर), रोमजी बीन अहमद (रा. जलान ईदाह-२, तमन सेताजी ईदाह, केदाह, मलेशिया), आशिष शंकर शहारे (२८, रा. द्वारावती रेसिडेन्सी, कोपरगाव, जि. अहमदनगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, फाळके प्राईड अपार्टमेंट, पाथर्डी फाटा), कुलदीप लखू देसले (३८, रा. सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) अशी या प्रकरणी कारागृहात रवानगी केलेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यातील रोमजी अहमद हा मलेशियन संशयित या खरेदी-विक्री व्यवसायाचा सूत्रधार असून तो फ्युचर बीट डॉट कॉम या वेबसाईटच्या मदतीने राज्यात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत होता.

मलेशिया आणि व्हिएतनाम शेजारी राष्ट्र असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले. या टोळीने नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अनेक बैठका घेऊन गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. शहर पोलीस सध्या शिर्डी येथे चौकशी करीत असल्याने आणखी काही नवीन बाबी समोर येऊ शकतात, असे पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*