Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आढळा कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा

Share

अकोले (प्रतिनिधी)–  कृष्णवंती नदीचे पाणी आढळा खोर्‍यात आणावे, बिताका प्रकल्पाच्या कामाचा पाठपुरावा करून उर्वरीत कामाला सुरुवात करावी, नदी, ओढे, नाले यांची पुनर्बांधणी करावी, बंधार्‍यांची दुरुस्ती व्हावी, सांगवी धरणातील पाण्याच्या आवर्तनाच्या तारखा निश्‍चित असाव्यात, आढळा प्रकल्पातील गाळ उपसा करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी आढळा कृती समितीच्या वतीने काल गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आढळाच्या पाणी प्रश्‍नावर आढळा कृती समितीच्या वतीने लाभ क्षेत्रातील गावांत जनजागृती मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. त्यानुसार पाणी प्रश्‍न व विविध मागण्यां संदर्भात गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार काल दुपारी कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बसस्थानक परिसरात एकत्रित आले. तेथून हातात मागण्यांचे फलक घेत घोषणा देत मोर्चेकरी तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे पोलिसांनी मोर्चा अडविल्या नंतर तहसील कार्यालयाबाहेरच मोर्चेकर्‍यांनी ठिय्या मांडला.

आढळा भागाचे होत असलेला वाळवंटीकरण आणि त्यातून संपत असलेली कृषी अर्थव्यवस्था याचमुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाव समृद्ध होण्यापेक्षा गावातील लोकांचे स्थलांतर होत आहे. शेती हाच एकमेव उपजीविकेचा साधन आहे आणि तेच साधन पाण्याअभावी निष्क्रिय स्वरूपाचे झाले आहे. आढळा नदीच्या पाणी प्रश्‍नावर आम्ही सामाजिक संघर्ष उभारणार आहे. या सामाजिक संघर्षाची लवकरच जाहीर घोषणा केली जाईल अशा आशयाची भाषणे आढळा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. आढळाचे शाखा अभियंता अभिषेक पवार हे यावेळी उपस्थित होते. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी कृती समितीचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले.पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!