हजारो नाशिककरांनी लूटला बिर्याणीचा आस्वाद; ‘व्हेज बिर्याणी पुलाव’ महोत्सवाचा शानदार समारोप

0
नाशिक । रविवाराचा सुट्टीचा दिवस, गप्पा, मित्रपरिवार, कुटूंबियांचा ओघ बिर्याणीचा अनोखा स्वाद घेत वातावरण आनंददायी दिसत होते. बिर्याणी, पुलाव बनवण्याची पध्दत आणि चवीनं खाण्याची मौज अनोखी होती. टमाटा, कांदा, मिरचीचा वापर आणि त्यातुन अस्सल महाराष्टयन मेनू खवय्यांसाठी अनोखी मेजवानी होती.

मसाल्यांचे लज्जतदार मिश्रण करून त्याला तडका देऊन शिजवलेला राईस आणि त्यातुन बिर्याणीची चव न्यारीच. महोत्सवाला अंदाजे अठरा हजाराहुन अधिक खवय्यांनी प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगीतले.

विश्वास लॉन्सवर आयोजीत खाद्य महोत्सवातुन खाद्य पर्वणीचा योग जुळून आला होता. नाशिककर खवय्यांसाठी व्हेज बिर्याणी पुलावांचे वैशिष्टपूर्ण प्रकार असलेल्या महोत्सवाचे आयोजन विश्वास लॉन्स येथे करण्यात आले होते. ‘विश्वास संकल्प आनंदाचा’, ‘विश्वास ग्रुप’, ‘विश्वास हॅपीनेस सेंटर’, व सारस्वत बँक तर्फे सदर उत्सव आयोजित करण्यात आला होता. आज विश्वास लॉन्स, नाशिक येथे या महोत्सवाचा सामारोप झाला.

मटका बिर्याणी, जैन बिर्याणी अशा अनेक प्रकारातुन जिभेचे चोचले खवय्ये पुरवत होते. चवदार आणि खमंग प्रकारच्या बिर्याणी पुलावाचे विविध प्रकार एकाच ठिकाणी आणून खाद्यसंस्कृतीचा नाविन्यपूर्ण अविष्कार खवय्यांना सुखावणारा होता. चांगल-चुंगल खाण्याची मजा किती और असते याचा अनुभव इथे प्रत्येक जण घेत होता. याचबरोबर निरनिराळ्या प्रकारचे मसालेदार चहा, आईस्क्रिम, सोलकढी यांवर खवय्ये ताव मारत होते.

‘मटका व्हेज बिर्याणी’, ‘व्हेज दम बिर्याणी’, ‘कोप्ता व्हेज बिर्याणी’, ‘व्हेज हैद्राबादी बिर्याणी’, ‘व्हेज शाही बिर्याणी’, ‘व्हेज चायनीज बिर्याणी’, ‘व्हेज काश्मिरी पुलाव’, ‘व्हेज ग्रिन पिस पुलाव’, ‘व्हेज टोमॅटो पुलाव’, ‘व्हेज शाही पुलाव’, ‘व्हेज चीज पुलाव’ तसेच कोकोनट राईस, लेमन राईस अशा पदाथारचा खवय्यांनी आस्वाद लुटला.

तसेच महोत्सवात विश्वास ग्रुपतर्फे गायकांसाठी अभिनव व्यासपीठ निर्माण करण्यात आले होते. यामध्ये विशेष गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ती विद्यार्थी, विद्यार्थीनी, खुल्या गटात महिला व पुरूष अशा चार गटांमध्ये स्पर्धा संपन्न झाली. विजेत्यांना ‘उत्सव’ प्युअर व्हेज रेस्टॉरंटतर्फे फुड कुपन्स व जयंत चांदवडकर यांच्यावतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*