गोदड महाराज जन्मोत्सव उत्साहात

0

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात सर्वत्र घरोघरी सडा रांगोळी काढून घरावर गुढी उभारून, फटाके फोडून महाराजांच्या जन्मदिवसाचे स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातून रथयात्रा पार पडल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांतून गोदड महाराज जन्मोत्सव बुधवारी (दि.2) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील गोदडमहाराज गल्ली येथे महाराजांचे समाधी मंदीर आहे. येथे ग्रामस्थांच्यावतीने जन्मसोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. 30 जुलै पासून महाराजाच्या चरित्र ग्रंथाचे पारायण करण्यात आले होते. बुधवारी समाधीस गावकरी, मानकरी व भाविकांनी अभिषेक केला. कार्यक्रमाचे संयोजन मंदिराचे मानकरी मेघनाथ पाटील, नगराध्यक्ष नामदेव राउत, काकासाहेब धांडे, सोमनाथ कुलथे, आबा पाटील, बप्पासाहेब धांडे, शहाजी नलवडे,उपनगराध्यक्ष बापुसाहेब नेटके, विनोद दळवी, ऋषिकेश धांडे, सतीश पााटील, अमृत काळदाते, अनिल गदादे, अक्षय राउत, काका ढेरे, सचिन गुंड, सचिन सोनमाळी, प्रफुल्ल नेवसे, रामदास हजारे, सतीश समुद्र, राम ढेरे, लालासाहेब शेळके, नगरसेविका मनीषा सोनमाळी, राणी गदादे, वृषाली पाटील, प्रतीभा भैलुमे यांच्यासह पुजारी, मानकरी व युवकांनी केले होते.

गोदडमहाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटील गल्ली येथे माजी जिल्हा परीषद सदस्य प्रवीण घुले व नगरसेवक सचिन घुले यांनी व त्यांच्या मित्रमंडळाच्यावतीने जन्मसोहळ्याचे आयोजन केले होते. विनोदाचार्य दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाले. सुदाम धांडे, भास्कर भैलुमे, विलास धांडे, प्रदीप पाटील, विजय घालमे, सुरेश खिस्ती, मालोजी धांडे, संजय पाटील, तानाजी पाटील, भाऊ तारेडमल, विजय उपस्थित होते.

कर्जतचे नाव होणार ‘अमरपूर’  –
आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगराध्यक्ष नामदेव राउत यांनी कर्जत शहराचे नाव बदलून अमरपूर करण्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थित हजारो भाविकांनी हात उंचावून अनुमती दिली. या नावाचा ठराव नगापालिका मान्यतेसाठी सरकारकडे पाठवणार आहे. तसेच पुढील वर्षापासून गोदड महाराज समाधी मंदिराजवळ पुरण पोळ्यांचा महाप्रसाद करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले

LEAVE A REPLY

*